AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mulshi Dam: पाण्यावरुन वाद पेटला! मुळशी धरणातील एक थेंबही पुणे- पिंपरी चिंचवडला देणार नाही, कुणी दिला इशारा?

मुळशी धरणातील पाणी आमच्या हक्काचे आहे. आमच्या तालुक्यात मुळशी धरण असताना आमची 564 कोटींची पिण्याच्या पाण्याची योजना मागील चार वर्षांपासून धुळ खात पडली आहे. फक्त पिण्याच्या पाण्याची परवानगी नसल्याने ही योजना रखडली आहे," असा आरोप अमित कंधारे यांनी केला आहे.

Mulshi Dam: पाण्यावरुन वाद पेटला! मुळशी धरणातील एक थेंबही पुणे- पिंपरी चिंचवडला देणार नाही, कुणी दिला इशारा?
| Updated on: Nov 22, 2026 | 4:53 PM
Share

दीपक कापरे, प्रतिनिधी:  मुळशी धरणाचं पाणी मुळशीकरांना मिळेपर्यंत पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराला एक थेंब देखील पाणी आम्ही देऊ देणार नाही असा इशारा पुणे जिल्हा माजी नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी दिला आहे. त्यामुळे आता पाण्यावरुन मुळशीकर विरुद्ध पुणे असा नवा वाद रंगणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

मुळशीच्या पाण्यावरुन वाद पेटणार! 

“२२ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुळशी धरणाचे पाणी पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहराला देण्याबाबत चर्चा झाली. ही चर्चा झाली सकारात्मक झाली. मात्र मुळशी धरणातील पाणी आमच्या हक्काचे आहे. आमच्या तालुक्यात मुळशी धरण असताना आमची 564 कोटींची पिण्याच्या पाण्याची योजना मागील चार वर्षांपासून धुळ खात पडली आहे. फक्त पिण्याच्या पाण्याची परवानगी नसल्याने ही योजना रखडली आहे,” असा आरोप अमित कंधारे यांनी केला आहे.

काय म्हणाले अमित कंधारे?

तसेच  “महाराष्ट्र शासन शहरी भागाचा ग्रामीण भागापेक्षा जास्त विचार करते की काय? असा प्रश्न पडला आहे. आम्ही मुळशीच्या पाण्यासाठी वारंवार आंदोलने केली आहेत, रस्त्यावर उतरलो आहे. येणाऱ्या काळामध्ये मुळशीचे पाणी आम्हाला न देता या दोन शहरांना मिळणार असेल तर आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात जाऊ. जोपर्यंत आम्हाला मुळशीकरांना आमचे हक्काचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एक थेंबही पुणे, पिंपरी चिंचवडला मिळू देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पुण्यात हजारो लिटर पाणी वाया! 

दुसरीकडे, पुणे शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांवर पाणी कपातीचा भार टाकला जात असताना, दुसरीकडे महापालिकेच्या फुटलेल्या जलवाहिन्यांमधून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून, पुणेकरांच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, असा संतप्त सवाल शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात