AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटातील वाद विकोपाला, बड्या नेत्याची थेट पोस्ट, देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच..

शिवसेना ठाकरे गटात मोठा वाद पुढे आला. गेल्या काही दिवसात वादाचा व्हिडीओ व्हायरल होत असताना थेट आता याबाबतची सोशल मीडिया पोस्टची शिवसेना ठाकरे गटाच्या एका बड्या नेत्याने शेअर केली. यामुळे ठाकरे गटातील वाद विकोपाला गेलाय.

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटातील वाद विकोपाला, बड्या नेत्याची थेट पोस्ट, देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच..
Uddhav Thackeray
| Updated on: Jun 22, 2026 | 9:26 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटाने फोडले आहेत. ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले होते. त्यांनी राजस्थानमध्ये जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. 6 खासदारांनी बंडखोरी केल्याने मोठा धक्का उद्धव ठाकरे गटाला बसला. या खासदारांनी मनधरणी करण्याचेही काम शिवसेना ठाकरे गटाने केले. मात्र, राऊतांनी केलेल्या टीकेनंतर हे खासदार नाराज झाले. ऑपरेशन टायगरनंतर हे सर्व खासदार आपल्या मतदार संघात परतत आहेत. ओमराजे निंबाळकर यांनी कालच आपली राजकीय भूमिका जाहीर केली. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. यादरम्यानच आता ठाकरे गटातील वाद विकोपाला गेल्याचे बघायला मिळत आहे.

ठाकरेंच्या सेनेत एकीकडे खासदार फूट तर दुसरीकडे नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. शिवसेना आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी थेट x पोस्ट शेअर केली. भास्कर जाधवांना विरोधी पक्ष नेता बनवण्यासाठी दिलेल्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा. मिलिंद नार्वेकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली.  अंमलबजावणी होत नसल्याने मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे, असेही मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

या पोस्टसोबतच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये भास्कर जाधव हे एका चॅनलला बाईट देत होते. यादरम्यानच मिलिंद नार्वेकर यांची गाडी मागून येते. त्यादरम्यान भास्कर जाधव रागाने बघतात. कोण आहे.. कोण आहे हे विचारतात, चालत चालत.. यावेळी भास्कर जाधव यांना सांगण्यात आले की, मिलिंद नार्वेकर आहेत.. चला… मात्र, यावेळी भास्कर जाधव इतके रागात होते की, त्यांनी थेट म्हटले मग काय झाले… नार्वेकर कोण लागून गेला..

गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत होता. अखेर मिलिंद नार्वेकर यांनी हा व्हिडीओ शेअर करत थेट पोस्टची लिहिली आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. मिलिंद नार्वेकर  यांच्या या पोस्टनंतर शिवसेनेतील वाद विकोपाला गेल्याचे दिसतंय. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

वर्धापन दिवशी नार्वेकर आणि भास्कर जाधव काय झाला वाद?

भास्कर जाधव वर्धापन दिनादिवशी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना मागून मिलिंद नार्वेकर यांची गाडी आली. यावेळी नार्वेकर यांच्या वाहन चालकाने जोरात हॉर्न वाजवल्याने भास्कर जाधव संतापले. हे आहेत आमचे नेते असं प्रतिक्रिया देताना म्हणाले, यावर मिलिंद नार्वेकर यांनी थेट संताप व्यक्त करत ट्विट केलं आहे. यामुळे पक्षात अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे

Follow Us
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह