
रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने मुंबईतील पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आणि एकच खळबळ उडाली. यादरम्यान पोलिसांनी मुलांना वाचवताना रोहित आर्याचा एनकाउंटर केला. आता रोहित आर्याच्या पत्नीचाही जबाव पोलिस नोंदवून घेणार आहेत. रोहित आर्याची एनकाउंटर आधीची मानसिक स्थिती समजून घेण्याचा पोलिस प्रयत्न करणार आहेत. त्याची मानसिक स्थिती कशी होती हे समजून घेण्यासाठी गुन्हे शाखा तज्ञांची मदत घेणार आहेत. रोहित आर्याच्या जवळच्या लोकांचे जबाब नोंदवून तो या सगळ्या घटनेआधी कसा होता? मानसिक स्थिती काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
घटनेच्या दिवशी रोहित आर्या खूप पॅनिक झाला होता. पोलीस त्याच्याशी बोलत असताना अचानक तो चिडून फोन कट करायचा आणि मुलांना ओलीस ठेवलेल्या भागात सारख्या फेऱ्याही मारत होता असेही पोलिसानी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी तीन ते चार जणांचे जबाब नोंदवले असून लवकरच आर्याच्या पत्नीचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. रोहित आर्याची पत्नी आणि मुलगा मागील काही दिवसापासून अहमदाबादला राहत होते. आर्या एकटाच भाड्याने घेतलेल्या घरात चेंबुरमध्ये राहत होता.
या प्रकरणात मृत आरोपी रोहित आर्याच्या कुटुंबांनी माैन बाळगले आहे. पवईतील ओलीस नाट्याचा सुत्रधार रोहित आर्या याने सुमारे 3 महिन्यांपूर्वी हा संपूर्ण कट रचून त्याची पूर्वतयारी सुरू केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने संबंधिताचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली आहे. रोहितच्या मृतदेहावर मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहित आर्याने गुरुवारी चित्रिकरणाच्या निमित्ताने मुलांना पवईच्या आर.ए. स्टुडियोत मुलाखतीसाठी बोलावले होते.
नंतर 17 मुलांना ओलीस धरले होते आणि यावेळी चित्रफित प्रसारित करून त्याने आपली भूमिका मांडली. सुमारे अडीच तासांच्या नाट्यानंतर मुंबई पोलिसांनी मुलांची सुटका करण्यासाठी केलेल्या कारवाईत रोहितचा आर्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रोहित आर्याविरोधात हत्येचा प्रयत्न, अपहरण आदी कलमांअतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखा-2 आर्याच्या मृत्युचा आणि गुन्हे शाखा- 8 चे पथक संपूर्ण ओलीस नाट्याच्या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
रोहित आर्याचा एनकाउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला आहे. गुन्हे शाखेच्या तपास पथकाने नोंदवला जबाब. रोहित आर्यावर गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, त्यावेळी परिस्थितीच तशी निर्माण झाल्याने गोळीबार केल्याच एपीआय वाघमारे यांनी जबाबात सांगितले. रोहित आर्याच्या पत्नीचाही जबाब गुन्हे शाखा नोंदवणार आहे. गुन्हे शाखा रोहित आर्याचे सर्व आर्थिक व्यवहारही तपासणार.