AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित आर्याचा भयंकर कट, पोलिस तपासात खळबळजनक माहिती, 4 मुलांचा तो व्हिडीओ टाकून…

रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने पवईतीस स्टुडिओमध्ये तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आता पोलिस तपासात खळबळजनक माहिती पुढे आल्याचे बघायला मिळतंय.

रोहित आर्याचा भयंकर कट, पोलिस तपासात खळबळजनक माहिती, 4 मुलांचा तो व्हिडीओ टाकून...
Rohit Arya
| Updated on: Nov 01, 2025 | 7:51 AM
Share

मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. फक्त इतकेच नव्हे तर आरोपीकडे बंदूकसह ज्वलनशिल पदार्थ होती. त्याने व्हिडीओमध्ये संपूर्ण इमारतीला आग लावून देण्याचे भाष्य केले होते. आता या प्रकरणाता मोठा खुलासा झाल्याचे बघायला मिळतंय. आरोपी हा कट मागील काही दिवसांपासून रचत होता. एका दिवसात काहीही घडले नव्हते. पवईतील अपहरण आणि धमकावण्याबाबतचा कट रोहित आर्या मागील तीन महिन्यांपासून आखत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रोहित आर्याने ‘A Wednesday’ या चित्रपटातील काल्पनिक कथा प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला.

रोहित आर्याने या बाल कलाकारांसाठी आॅनलाईन जाहिराती दिल्या होत्या, पवईतील स्टुडिओही स्वत:च भाड्याने बुक केला होता. जाहिरात पाहून राज्याच्या कानाकोपऱ्यातून 70 मुले आॅडिशनसाठी आली होती. यातील 17 मुलांची निवड त्याने केली. ही निवड करताना मुलांचे तीन ग्रुपही बनवले होते. घटना प्रत्यक्षात करत असताना सर्वांनाच हे सर्व चित्रपटाचा भाग आहे असे वाटत असल्याने आर्याला तितका विरोध झाला नसल्याचे सांगितले जाते.

इतकेच काय तर पोलिसांना घाबरवण्यासाठी प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी आर्या त्याच्यासोबत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्या 4 मुलांना पेटवणारही होता. याबाबतचं साहित्यही सोबत होतचं. सुरूवातीला 4 मुलांना पेटवण्याचे त्याचे प्लॅनिंग होते आणि त्याच्या व्हिडीओ शेअर करत तो प्रशासनाला वेठीस धरणार असल्याची माहिती पुढे येतंय. आर्याच्या त्या व्हिडिओत तो एकटा नसून अन्य लोकही आपल्यासोबत असल्याचा दावा करताना तो दिसतोय.

आता पोलिस याचा शोध घेत आहेत, की आर्या याच्यासोबत इतर लोक नेमकी कोण होती. पोलिसांनी सतर्कता दाखवत सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, रोहित आर्या याचा हैराण करणारा प्लॅन असल्याचे पोलिस तपासात पुढे येताना दिसतंय. पोलिसांनी मुलांचे मेडिकल चेकअप करून चाैकशी झाल्यानंतर त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवले. शिक्षणात विभागाने आपले दोन कोटी रूपये दिले नसल्याचे रोहित आर्याने म्हटले होते. मात्र, रोहित आर्याचे आरोप खोटे असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.