AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एन्काऊंटरच्या 4 दिवस आधी मराठी कलाकारांना भेटलेला रोहित आर्या, कारण काय?

जवळपास 17 विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणारा माथेफिरू रोहित आर्याची काही मराठी कलाकारांनीही भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. हे कलाकार रोहितच्या स्टुडिओमध्ये त्याला भेटले होते. गिरीश ओक, तेजश्री प्रधान, स्वप्निल जोशी, उर्मिला कोठारे यांनी त्याची भेट घेतली होती.

एन्काऊंटरच्या 4 दिवस आधी मराठी कलाकारांना भेटलेला रोहित आर्या, कारण काय?
Rohit Arya
| Updated on: Oct 31, 2025 | 2:07 PM
Share

मुंबईतील पवई इथल्या आर. ए. स्टुडिओमध्ये गुरुवारी जवळपास अडीच तास अपहरणनाट्य रंगलं होतं. शॉर्टफिल्मच्या ऑडिशनसाठी बोलावून 17 अल्पवयीन मुलांना या स्टुडिओमध्ये एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने ओलीस ठेवलं होतं. पोलिसांनी वॉशरुममधून प्रवेश करून 17 मुलांसह एकूण 19 जणांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्या याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता नवनवीन आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. ज्या स्टुडिओमध्ये रोहित आर्या ऑडिशन घेत होता, त्या स्टुडिओला मराठी कलाविश्वातील काही नामवंत कलाकारांनी भेट दिल्याचं कळतंय. जेष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेसुद्धा आर. ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्याला भेटल्याचं आणि ऑडिशन सुरू असलेल्या मुलांशी संवाद साधल्याचं समजतंय. विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी ते स्टुडिओमध्ये गेल्याचं कळतंय.

स्वप्निल जोशी, तेजश्री प्रधान स्टुडिओत गेले होते?

पोलिस चकमकीत मारला गेलेला रोहित आर्या हा नागपूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षक होता. तो मनोरुग्ण असल्याचंही सांगण्यात येत आहे. मुलांना ओलिस ठेवण्याचा प्लॅन अंमलात आणण्यापूर्वी त्याने बरीच तयारी केली होती. रोहितने शॉर्टफिल्मसाठी 800 बालकलाकारांचे व्हिडिओ मागून घेतले आणि त्यातील 80 निवडले. त्यानंतर 35, 20 आणि अखेर 17 बालकलाकारांचा त्याने चार दिवसांचा वर्कशॉप घेतला. या चार दिवसांच्या काळात मीनल कपूर, स्वप्निल जोशी, तेजश्री प्रधान, अंकुश जोशी हे कलाकार स्टुडिओत येऊन गेल्याचंही कळतंय. डिसेंबर महिन्यात रोहितने 14 दिवसांच्या शूटिंगचा प्लॅन केला होता.

ऑडिशन घेतोय सांगून मुलांना ठेवलं डांबून

रोहितला मुलांच्या अपहरणावर एक हॉरर चित्रपट बनवायचा होता. त्यासाठी काहींच्या पालकांचेही त्याने ऑडिशन्स घेतले. घटना घडायच्या आधी त्यांनी प्रत्यक्ष चित्रपटाच्या अनुषंगाने अभिनय केला. नंतर रोहिकने पालकांना आणि मुलांना सीन क्रिएट करत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याने 17 मुलांना डांबून ठेवलं. पण हा शूटिंगचाच भाग असल्यामुळे आम्हाला कुणालाही शंका आली नाही, अशी माहिती एका पालकाने दिली.

मुलांना ओलीस ठेवल्याचा व्हिडीओ तयार करून रोहित आर्याने तो त्यांच्या पालकांना पाठवला होता. “मी दहशतवादी नाही, माझी पैशांची मागणी नाही. मला फक्त संवाद साधायचा आहे. मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. त्यासाठी मी हे सर्व करतोय”, असं त्याने या व्हिडीओत म्हटलं होतं.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.