AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walmik Karad: बीड पोलीस ठाण्यात आणले पाच पलंग, वाल्मिक कराडवरुन रोहित पवार यांचा निशाणा

Valmik karad news: पोलीस ठाण्यात मागवलेल्या पलंगाच्या बातम्या येताच पोलिसांनी तातडीने खुलासा केला आहे. बीड पोलीस ठाण्यात पलंग नव्हे तर पोलीस शिपायांसाठी कॉट आणल्याची माहिती दिली आहे.

Walmik Karad: बीड पोलीस ठाण्यात आणले पाच पलंग, वाल्मिक कराडवरुन रोहित पवार यांचा निशाणा
Walmik Karad
| Updated on: Jan 02, 2025 | 10:08 AM
Share

Walmik Karad: राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात प्रमुख संशयित वाल्मिक कराड याला ३१ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची सीआयडी चौकशी बीड पोलीस ठाण्यात होत आहे. त्याचवेळी आता बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आला आहे. या प्रकरणाचा संदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वाल्मिक कराड यांच्याशी जोडला आहे. त्यांनी या प्रकरणात एक ट्विट केले आहे. त्यात अचानक पलंग कसे मागवले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांनी काय म्हटले?

आमदार रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. हे पलंग स्टाफसाठी मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी.

दरम्यान, पोलीस ठाण्यात मागवलेल्या पलंगाच्या बातम्या येताच पोलिसांनी तातडीने खुलासा केला आहे. बीड पोलीस ठाण्यात पलंग नव्हे तर पोलीस शिपायांसाठी कॉट आणल्याची माहिती दिली आहे.

सीआयडीकडून वाल्मिक कराड याची १५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयात मागितली गेली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी दिली. पोलीस कठोडीत असताना वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली होती. त्याला ऑक्सिजन लावावे लागले होते. त्यानंतर त्याला बरे वाटले. कठोडीत पहिल्या दिवशी सीआयडीकडून त्याची कठोर चौकशी करण्यात आली. स्वत: सीआयडीच्या पोलीस अधीक्षकांनी त्याची चौकशी केली.

वाल्मिक कराड संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून फरार होता. २२ दिवसांनी पुण्यात तो शरण आला. त्यानंतर त्याला बीडमधील केज न्यायालयात आणण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील सर्व फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वाल्मिक कराड शरण आला.

हे ही वाचा…

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचे एन्काऊंटर…बड्या नेत्याचा दावा

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.