वाईट वाटलं असेल तर मी व्यक्तिगत सुनेत्रा पवारांची माफी मागतो.. रोहित पवारांचं विधान पण ‘त्या’ भूमिकेवर ठाम

पुण्यातील गुन्हेगारी आणि पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला वाद अजूनही थांबलेला नाही. आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची व्यक्तिगत माफी मागितली असली, तरी आपल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत. अजित पवारांचा प्रशासनावर वचक होता, आता पुणे पोलीस आयुक्त सुनेत्रा पवारांचं ऐकतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वाईट वाटलं असेल तर मी व्यक्तिगत सुनेत्रा पवारांची माफी मागतो.. रोहित पवारांचं विधान पण त्या भूमिकेवर ठाम
Rohit Pawar apologises
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 8:49 PM

सुनील काळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी :  सुनेत्रा पवार यांना आपल्या वक्तव्यामुळे वाईट वाटलं असेल तर व्यक्तिगत माफी मागतो, असं रोहित पवार म्हणाले. मात्र, पुण्यात बलात्कार, विनयभंग आणि कोयत्याने हल्ल्यांच्या घटना घडत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. अजित पवारांसारखा प्रशासनावर वचक निर्माण करणं कुणालाही शक्य नाही, असं म्हणत त्यांनी पुण्यात अराजकीय आंदोलन उभारण्याचाही इशारा दिला.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

मी बारामतीकर आहे पुणे जिल्ह्याचा नागरिक आहे. एक पुणेकर नागरिक म्हणून मी अजित पवारांना पालकमंत्री म्हणून पाहिलं आहे. पुणे शहर ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड मधे अजित पवारांना पाहिलं आहे. मी सुनेत्रा पवारांची व्यक्तिगत माफी मागतो. भाजप सोबत अजित पवारांचा पक्ष गेला तेव्हापासून पुणे सीपी केवळ भाजपच ऐकतात. मी म्हणालो सुनेत्रा पवारांना ताकद द्या. मुख्यमंत्री यांचा आदर आहे. मात्र गुन्हेगारीचा विषय मोठा आहे. बलात्कार विनयभंग कोयत्याने मारामारी होतं आहे. अशा घटना घडत आहे त्यामुळे मी भावनिक होऊन बोललो. पुणे शहरात काय काय घडलं याची ६ महिन्याची यादी माझ्याकडे आहे. ते म्हणतात ६ महिन्यात काहीही झालं नाही.

Loading...

कुठेही राजकारण आणि चाचपणी नाही आहे. आम्ही आंदोलन करणार आहे. पुणे , पिपंरी चिंचवड दादा आणि पुण्याचा विषय येतो. काही प्रमाणात आक्रमक असतील. सुनेत्रा पवार खासकरून वैयक्तिगत मी माफी मागतो त्यांना वाईट वाटलं तर. पण अजित पवारांची जागा कुणीही घेऊ शकत नाही कारण त्यांचा प्रशासनावर वचक होता, असं आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

आंदोलनाची तारीख मागे पुढे होवू शकतो. हे आंदोलन अराजकीय असणार आहे. सामाजिक कार्यकर्ते असणार आहेत. आता त्यातून दबाव आणून लोकांना न्याय मिळावं.  आंदोलन मोठं व्हायला पाहिजे. चाचपणी कश्याला करायला हवं. शरद पवार आजोबा आणि सुळे माझी आत्या आहे. आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी जिल्हापरिषद सर्व ठिकाणी कसे निवडून येतील याबाबत आज पक्षाची महत्वाची बैठक पार पडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us