AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराबाहेर लटकवलेली बकरी, कापलेले अंगठे, अजित पवारांच्या निधनापूर्वी घराबाहेर काय काय सापडलं?

रोहित पवार यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर राहून तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. अजित पवारांच्या घराबाहेर झालेल्या कथित पूजेबाबत आणि अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

घराबाहेर लटकवलेली बकरी, कापलेले अंगठे, अजित पवारांच्या निधनापूर्वी घराबाहेर काय काय सापडलं?
ajit pawar
| Updated on: Apr 28, 2026 | 12:14 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवारांचे एका विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाला आज तीन महिने उलटले आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आता याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी (CID) कार्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी तपास यंत्रणेच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करत सत्ताधारी आणि अजित पवार गटाशी संबंधित एका छोट्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या बारामती आणि मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर झालेल्या कथित पूजा, काय काय आढळले, याबद्दलची माहिती दिली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पुढच्या वेळी मला वॉचमनशीच संवाद साधावा लागेल

सीआयडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, “मी तिसऱ्यांदा सीआयडी कार्यालयात आलो आहे, पण एकही जबाबदार अधिकारी तिथे उपस्थित नाही. मला तिथे असलेल्या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढावे लागले. सरकार आणि तपास यंत्रणा या प्रकरणाला गांभीर्याने घेत नसल्याचेच हे लक्षण आहे. पुढच्या वेळी मला वॉचमनशीच संवाद साधावा लागेल.”

अशोक खरात आणि आर्थिक उलाढाल

रोहित पवार यांनी भोंदू बाबा अशोक खरातच्या नावाचा उल्लेख यावेळी केला. या अँगलने तपास करावा, अशी मागणी केली. २७, २८ आणि २९ जानेवारी रोजी अशोक खरातच्या बँक खात्यात अचानक मोठी आर्थिक उलाढाल का झाली? बारामतीमधील एक छोटा राजकीय नेता सातत्याने खरातच्या संपर्कात होता. या नेत्याचे इतर मोठ्या नेत्यांशी आर्थिक संबंध असून, त्यानेच ही सर्व रॅकेट चालवली असल्याचा संशय आहे,” असे रोहित पवार यांनी नमूद केले.

काटेवाडी आणि देवगिरीबाहेर पूजा?

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनापूर्वी काटेवाडीतील घराजवळ, बारामतीमधील निवासस्थानी आणि मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर विचित्र पूजा करण्यात आल्या होत्या. काटेवाडीत एका विहिरीशेजारील झाडाला बकरीची पूजा करून टांगण्यात आले होते, तिथे आता फक्त हाडे आणि मांस उरले आहे, असे रोहित पवार म्हणाले.

आम्ही काळ्या जादूवर किंवा भोंदूगिरीवर विश्वास ठेवत नाही, पण या कृत्यांमागचा नेमका उद्देश काय होता? खरातने एका शेतकऱ्याला सांगितले होते की, पवार कुटुंबावर लवकरच मोठा आघात किंवा अडचण येऊ शकते. हे सर्व राजकीय षडयंत्राचा भाग आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

यावेळी रोहित पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांवर टोला लगावला. अजित दादांच्या मोठ्या नेत्यांच्या करंगळ्या आणि अंगठे कापले होते, आता या छोट्या नेत्याचे काही कापले आहे का, याचा शोध आम्ही घेत आहोत. या सर्व प्रकरणातील सीडीआर (CDR) माहिती डाऊनलोड झाली असून, त्यातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता रोहित पवार यांनी वर्तवली आहे.

Follow Us
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका