AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : क्रिमिनल अँगल का तपासला जात नाही? रोहित पवारांचा संताप

अजित पवार यांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक झाले असून, त्यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडत एफआयआरची मागणी केली आहे.

Ajit Pawar Plane Crash : क्रिमिनल अँगल का तपासला जात नाही? रोहित पवारांचा संताप
ajit pawar rohit pawar
| Updated on: Feb 26, 2026 | 1:40 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामतीत भीषण विमान अपघात झाला. यात दुर्देवाने त्यांचे निधन झाले. अजित पवारांच्या निधनानंतर आता काही आठवडे उलटले आहेत. अजित पवारांच्या अपघातानंतर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे अजित दादांच्या अपघाता प्रकरणी विविध खुलासे करताना दिसत आहेत. आज रोहित पवार, युगेंद्र पवार यांनी बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. २८ तारखेला फक्त अपघाताचा रिपोर्ट फाईल झाला, मग क्रिमिनल अँगलचं काय? असा सवाल रोहित पवार यांनी यावेळी केला.

रोहित पवार यांनी बारामती पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली नाही, याबद्दलची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या देशाचे जे एव्हियेशन मंत्री आहेत. ज्यांचा राजीनामा आम्ही मागतो. आम्ही तक्रार करताना मंत्र्‍याचे नाव घेतलं नाही. कारण आम्हाला राजकारण करायचं नाही. पोलिसांना इतकंच सांगितलं की एफआयआर व्हावा ही नागरिक म्हणून आमची इच्छा आहेत. तो तुम्ही स्वीकारावा. त्यांना तो स्वीकारावाच लागतो, असे रोहित पवार म्हणाले.

दादांच्या बाबत एफआयआर घेतला जात नाही

पोलीस एफआयआर करण्यास नकार देत होते. त्यांचं म्हणणं की अॅक्सिडेंट रिपोर्ट झाला आहे. दादांचा आतापर्यंत अॅक्सिडेंट रिपोर्ट झाला. सीआयडी चौकशी करत आहे हे सांगितलं. पण अॅक्सिडेंट रिपोर्ट झाल्यावर क्रिमिनल अँगलने चौकशी का करत नाही. त्यानंतरही एफआयआर का घेत नाही. दादांच्या बाबत एफआयआर घेतला जात नाही. आम्ही तपास यंत्रणाच्या आड येत नाही. कुणीही चौकशी करावी. आमचं म्हणणं आहे की एफआयआर दाखल करा आणि तो सीआयडी किंवा सीबीआयला द्या, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

आता अधिकारी सकारात्मक दाखवायला लागले

आम्ही पोलिसांना सर्व पुस्तके वाचून दाखवली. नियम दाखवले. आता अधिकारी सकारात्मक दाखवायला लागले. काल जसे पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव होता. तसाच इथे दबाव जाणवत होता. हे कार्यालय अजितदादांनी बांधलं आहे. त्यांनी पोलीस आणले. त्यामुळे चौकशीची मागणी करत आहोत. आता पोलीस म्हणतात आम्हाला एक तास द्या, असे रोहित पवारांनी म्हटले.

सर्व १०० वकील आणि पदाधिकारी स्वेच्छेने इथे आले आहेत. अजितदादांना न्याय देण्यासाठी आले आहे. सीआयडी चौकशी करत आहे तर करू द्या. अधिकारी कोण आहे, काय तपास केला हे समजू द्या. आता २७ दिवसात काहीच का नाही झालं हे सांगितलं पाहिजे. बारामतीतील पोलिसांवरही दबाव आहे, असाही दावा रोहित पवारांनी केला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या