AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंगपिसाट खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडीओ? रोहित पवार यांची धक्कादायक माहिती; काय केली मागणी?

लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आता या प्रकरणावर रोहित पवार यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

लिंगपिसाट खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडीओ? रोहित पवार यांची धक्कादायक माहिती; काय केली मागणी?
रोहित पवारImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 13, 2026 | 11:48 AM
Share

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ माजली होती. अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. त्याचे महिलांसोबत नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशोक खरताविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर आता त्याची SIT चौकशी सुरु आहे. दरम्यान, या प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

रोहित पवार यांनी नाशिकमधील प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात केवळ सामान्य लोक किंवा अराजकीय व्यक्तींचे नव्हे तर राजकीय नेत्यांचेही व्हिडीओ आहेत. “खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडीओ आहेत का?” असा प्रश्न उपस्थित करत रोहित पवार यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, “नाशिकमध्ये ३५ हनी ट्रॅप प्रकरणे समोर आली. त्यात काय कारवाई झाली? संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला का? काही अधिकाऱ्यांना गप्प केले गेले का? हे व्हिडीओ बाहेर कसे आले? हे सामान्य लोकांचे व्हिडीओ आहेत असे सांगितले जाते, पण खरंतर यात राजकीय लोकांचे व्हिडीओ आहेत. कुणाचे आहेत, कोण कोण त्यांच्यासोबत होते, हे सर्व उघडपणे समोर यायला हवे.”

‘सगळ्यांची चौकशी व्हायला हवी’

रोहित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, “भाजप नेहमी आपल्या मित्र पक्षांना संपवण्यासाठी असे प्रकार करते. नितीश कुमारचे काय झाले? साताऱ्यात काय चालले आहे?” त्यांनी पुढे सांगितले की, “आता जर चौकशी करायची असेल तर सगळ्यांची करा. सर्व नेत्यांची चौकशी झाली व्हायला पाहिजे. त्या गेल्या पण इतर लोक का बाहेर येत नाही. एसआयटीचा चुकीचा वापर लोक करत असतील, काही लपवत असतील, काही नेते म्हणत आहेत की आमच्या लोकांचे व्हिडीओ पुढे येऊ देऊ नका.. एसआयटीचा वापर सिस्टीन क्लियर करण्यासाठी करा.”

खरातच्या जमिनी विकून विद्यार्थ्यांसाठी वापरा

रोहित पवार यांनी खरातच्या जमिनींच्या मुद्द्यावरही आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “खरातच्या जमिनी विका आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरा… पण लवकर करा.”

समृद्धी मार्गातील भ्रष्टाचाराचा आरोप

समृद्धी महामार्गाच्या जमिनी खरेदीप्रकरणातही रोहित पवार यांनी राजकीय नेत्यांवर आरोप केले. ते म्हणाले, “समुद्धी मार्ग कसा जाणार हे माहिती असल्याने काही राजकिय लोकांनी जमिनी घेतल्या. खरातला आतून माहिती मिळाली त्यामुळे भोंदूबाबाचाही फायदा झाला. खऱ्या शेतकऱ्याचा या समृद्धी महामार्गाला विरोध होता. आता जे खरे शेतकरी आहेत त्यांचा शक्ती मार्गावर विरोध आहे”

रोहित पवार यांच्या या विधानांनी नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाला नवे वळण आले आहे. SITच्या चौकशीत सर्व राजकीय नेत्यांचा समावेश करावा आणि सर्व व्हिडीओ सार्वजनिक करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
Shiv Sena Supreme Court Hearing | सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; धनुष्यबाणावर कोणाचा हक्क? आज होणार फैसला
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब
देशाच्या संविधानावर विश्वास...राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास..., खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार