AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात 2 महत्त्वाच्या परीक्षेच्या निकालात मोठी गडबड; रोहित पवारांच्या दाव्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ

रोहित पवार यांनी देशातील दोन महत्वाच्या परीक्षेच्या दोन निकालात गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

देशात 2 महत्त्वाच्या परीक्षेच्या निकालात मोठी गडबड; रोहित पवारांच्या दाव्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ
| Updated on: Aug 04, 2026 | 12:29 PM
Share

नीट पेपरफुटीनंतर देशातील इतरही परीक्षेत घोटाळा होत असल्याचा दावा केला जात आहे. नीट पेपरनंतर आता सीईटी, जेईई परीक्षेच्या निकालातही गडबड होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांच्या दाव्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांनी दोन्ही परीक्षा घेणार्‍या कंपन्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच परीक्षा टेंडरची देखील चौकशीची मागणी केली आहे.

रोहित पवारांचा दावा काय?

आमदार रोहित पवार यांनी पत्रकर परिषद घेत मोठा दावा केला. या प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, ‘ सीईटी परीक्षेत वर्षाला 10 लाख विद्यार्थी बसतात. वर्षाला दोन वेळा परीक्षा घेतला जातो. इंजिनीअरिंग, फार्मसीसाठी हा पेपर घेतला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांची रँकनुसार यादी लावली जाते. या प्रकरणाविषयी महत्त्वाची माहिती काहींनी दिली. काही जण म्हणतात, विद्यार्थी बारावीपेक्षा सीईटीचा जास्त अभ्यास करतात. सीईटीचा अभ्यास हा अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमावर पेपर घेण्यात येतो. त्यात जेईई ही परीक्षा अवघड असते. काही विद्यार्थ्याला निकालात गोंधळ पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांचे दहावी, बारावी, सीईटीच्या निकालात फरक पाहायला मिळत आहे’.

‘अभ्यासू विद्यार्थ्याला बारावी आणि सीईटीमध्ये चांगले गुण मिळू शकतात. मी परिस्थिती सांगितल्यास डोळे पांढरे होतील. शंभर विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये असतील. काही विद्यार्थ्यांच्या निकालात घसरण पाहायला मिळत आहे. जो विद्यार्थी दहावी आणि बारावीत चांगले गुण मिळवत होता. परंतु 2023 साली गडबड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुण मिळू लागले. दुसरीकडे एका नगरसेवकाच्या दोन मुलांना एक सारखे गुण मिळाले. मी त्यांच्या शैक्षणिक क्षमतेवर सवाल उपस्थित करत नाही, असे त्यांनी जाहीर केले.

सीईटी परीक्षेच्या निकालातील नेमका घोळ काय?

‘खरंतर या प्रकरणात सेंटर मॅनेज केले जातात. नॉर्मलायझेशन आणि पर्सेंटाइलमध्ये घोळ होऊ शकतो. एका विद्यार्थ्याला 200 पैकी 104 मिळाले. त्यानुसार त्याला 50 टक्क्यांहून अधिक गुण मिळायला पाहिजे होती. सीईटीमध्ये पर्सेंटाइल काढले जातात. एका विद्यार्थ्याला दोनशेपैकी 104 गुण मिळूनही त्याला 9 पर्सेंटाइल मिळाले. त्यानंतर विद्यार्थी आणि त्याचे वडील सीईटी कार्यालयात गेले. त्यांनी एमएच सीईटी च्या परिक्षेत पर्सेंटाईल काढण्याचे सूत्र नेमके कसे? हे सीईटीकडून सांगण्यात येत नाही, आर टी आय अंतर्गतही ही माहिती दिली जात नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले.

‘पर्सेंटाईल काढण्याचे सूत्र दाखवले जावे ही आमची मागणी आहे. Eduspark या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या ७ विभागांमध्ये काम मिळवले. एड्युसपार्क या कंपनीची चेन निर्माण करुन आपल्याचं संबंधित कंपन्यांना काम दिले गेले. बिहार सरकारनं या संदर्भात थेट पंतप्रधानांना तक्रार केली. कार्टेल करुन , कंपन्यांचा गट तयार करुन कंत्राटे मिळवली जात असल्याचे निदर्शनास आले होते, असा आरोप त्यांनी केला.

काय आहेत रोहित पवारांच्या मागण्या?

निकालाचे फोरेन्सिक AUDIT करणे

2023 पासूनच्या CET निकालाची Academic Corelation चेक करणे सेटिंग करून देणाऱ्या संस्था /क्लासेस / एजंटचे जाळे शोधणे

टेंडर प्रक्रियेची चौकशी करणे

परीक्षा पूर्वीप्रमाणे OMR वर ऑफलाईन घ्यावी

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...