AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय, रोहित पवारांनी थेट भाजपच्या बड्या नेत्याबद्दल वापरले असे शब्द

Rohit Pawar : "त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं" अशी टीका रोहित पवारांनी केली.

Rohit Pawar : त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय, रोहित पवारांनी थेट भाजपच्या बड्या नेत्याबद्दल वापरले असे शब्द
Rohit Pawar
| Updated on: Oct 01, 2026 | 12:10 PM
Share

महाराष्ट्रात सध्या जिल्हा बँक निवडणुकीचं वारं वाहत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षातील बड्या नेत्यांकडून ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरु आहे. त्यात काही ठिकाणी प्रस्थापित पक्षातील नेते परस्परासमोर उभे ठाकणार आहेत. विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्यावर याच निवडणुकीवरुन रोहित पवार यांनी बोचरी टीका केली आहे. “तीन अपत्ये असूनही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. विधानपरिषदेसारख्या कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतींनाच कायदे-नियम माहित नसतील तर याला काय बोलावं?” असं रोहित पवार म्हणालेत.

“त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं. एकतर कर्जत-जामखेडमध्ये केवळ मला विरोध करण्यासाठी आणि मतदारसंघात गुंतवून ठेवण्यासाठीच त्यांना पद देण्यात आलं हे सूर्यप्रकाशाइतकं ढळढळीत सत्य आहे” असं रोहित पवार म्हणाले.

‘हाथ खाली और बजाओ ताली…’

“पण त्यांना साधे कायदे-नियमही माहित नसतील तर अशा व्यक्तीला सभापती पदावरून तातडीने हटवून गणपती मंडळाच्या किंवा स्थानिक उत्सव मंडळाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी मुक्त करावं. यामुळं सभापतीपदासारख्या प्रतिष्ठेच्या पदाची अप्रतिष्ठा आणि महाराष्ट्राचं नुकसान होणार नाही” असं रोहित पवार म्हणाले. “एकतर सगळीकडंच प्रा. राम शिंदे यांचा झेंडा लावला जात असेल तर भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्थाही आज ‘हाथ खाली और बजाओ ताली…’ अशीच झाली. त्यामुळं त्यांना सभापती पदावरून हटवलं तर किमान कायद्याची जाण असलेल्या हुशार आमदाराला तरी या पदावर काम करण्याची संधी मिळेल” अशी टीका रोहित पवार यांनी केली.

सुजय विखेंच्या वक्तव्यावर राम शिंदे यांचा जोरदार टोला 

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीवरून राम शिंदे-सुजय विखे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. सुजय विखेंच्या वक्तव्यावर राम शिंदे यांनी जोरदार टोला लगावला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या बिनविरोध निवडणुकीच्या भूमिकेचा सन्मान केला पाहिजे असे राम शिंदे म्हणाले.

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....