
रामचंद्र देवतारे लिखित संघ जीवन भाग 1 आणि भाग 2 पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वाचे विधान केले आहे. संघाबाबत वाईट बोलणाऱ्या लोकांवर त्यांनी भाष्य केलं आहे, तसेच स्वयंसेवकाचं जीवन कसं असतं हेही मोहन भागवतांनी सांगितलं आहे. मोहन भागवत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
संघ जीवन भाग 1 आणि भाग 2 पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, देशाला स्वतंत्र कोणामुळे मिळालं अशी चर्चा चालते, 1857 पासून प्रयत्न सुरू झाले आणि सगळीकडे अगडबंब उसळला त्यानंतर आग कधी शांत झाली नाही. कालांतराने अनेक प्रयत्न झाले या सगळ्याचा टोटल म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हे खरं असलं तरी ज्यांच्या हयातीत मिळाल त्यांच्या खात्यात ते जाणार यात काही वावग नाही. श्रेय स्वीकारणे वावग नाही मात्र त्यांच्या श्रेय डोक्यावर आलं तर त्याचा अहंकार येतो. ज्याच्या चरित्याची खोली जास्त असते त्याला यश पचवणे शक्य होते.
संघाबाबत बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘संघासाठी कोणी काय केलं हे मला सांगावं लागतं. माझ्यापेक्षाही संघ सांगू शकणारे अनेक आहेत. त्यांनाही जबाबदारी असते. मी हे केलं म्हणून मी फार मोठा आहे असे नाही आणि जे करत नाही त्यांना जमत नाही असंही नाही.कोण काय करतं याला महत्त्व नाही. कोण कसा आहे यापेक्षा कोण कस दिसतय याला महत्व आहे.
संघाच्या चांगल्या आणि वाईट बाजूने बोलणारे लोक…
संघाची माहिती नसणारे, संघाच्या चांगल्या आणि वाईट या दोन्ही बाजूने बोलणारे लोक आहेत. पण एखादा संघाला जेव्हा जवळ येऊन पाहतो तेव्हा, तो कितीही मोठा असो, प्रसिद्ध असो, देशातला सुखी प्रदेशातला असो, तो ‘मला फार आनंद झाला आणि खूप शिकायला मिळालं’ हे वाक्य नेहमी बोलतो.
स्वयंसेवक शिकवायच्या भूमिकेत नसतो, तो जगायच्या भूमिकेत असतो
मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांबद्दल बोलताना म्हटले की, स्वयंसेवकाचे जीवन भावपूर्ण असतं. लोकांमध्ये लोकांसारखा राहतो, आपली कर्तव्य पार पाडतो. पण तो सामान्य अवस्थेत राहून असामान्य असल्याचा अनुभव घेत असतो.संघातील सर्वात उच्च श्रेणी म्हणजे सामान्य स्वयंसेवक. प्रत्यक्ष संघाचं काम हे स्वयंसेवक करत असतो. कोणी येवो न येवो रोज शाखेत जाऊन स्वतःची अडचण बाजूला सारून दुसऱ्याची मदत करत असतो.
1971 च्या युद्धात सैनिक लढत होते, त्यांना साहित्य पोहचवण्याचा काम संघाचा स्वयंसेवक करत होते. संघाचा स्वयंसेवक हा निस्वार्थपणे वागतो ही परंपरा आहे. संघाचा स्वयंसेवक केवळ आपला परिवार नव्हे तर सगळा समाज आपला मानतो. स्वयंसेवक नियमित संस्काराची साधना करतो. सेवा करत असताना भावही जाणवू देत नाही.
जे लोक संघाचे विचार ऐकतात पुस्तक वाचतात, तेव्हा संघ त्यांना कळतो. काही काळापूर्वी संघाबाबत लोक लिहत होते. मात्र संघाच्या त्या कार्यावर कोणी विश्वास करत नव्हते. आता संघ सगळीकडे पोहोचायला सुरुवात झाली आहे.स्वयंसेवक आपली शक्ती एकवटून काम करतात त्यामुळे संघ हा इतका मोठा वाढला.