AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील आरटीओ सोमवारी सकाळी दोन तास ठप्प, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

संपूर्ण राज्यात आरटीओच्या कामकाजात एकसूत्रता नसल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्यातील आरटीओ सोमवारी सकाळी दोन तास ठप्प, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
RTO ANDHERIImage Credit source: socialmedia
| Updated on: May 07, 2023 | 8:23 PM
Share

मुंबई : राज्याच्या परिवहन विभागाचा कारभार सुरळीत चालावा यासाठी दोन वेळा आरटीओ (RTO ) प्रणालीत बदल झाला होता. परंतू त्यानूसार प्रशासकीय यंत्रणेत बदल झाला नव्हता. यासाठी आरटीओ विभागाच्या आकृतिबंधाला गेल्यावर्षी परिवहन विभागाने मान्यता दिली होती. परंतू आता नविन सरकार आल्यानंतर आकृतिबंध प्रत्यक्षात अंमलात येणे बारगळले आहे. या आकृतिबंधानूसार अनेक कर्मचाऱ्यांच्या ( employee ) संख्येत वाढ आणि समानता येणार होती. त्यामुळे आकृतीबंधाची अंमलबजावणी लवकर व्हावी आणि अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचारी सोमवारी सकाळी दोन तास लेखणी बंद आंदोलन करणार आहेत.

 गेल्या 23 सप्टेंबर रोजी आकृतीबंधास मंजूरी

राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक विभागाचा आकृतीबंध तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे, आकृतीबंधाचा प्रस्ताव कर्मचारी संघटनेने प्रशासनास सन 2016 साली सादर केला होता, आकृत्तीबंध मंजूरीसाठी संघटनेने सलग सहा वर्षे प्रखर लढा दिल्यानंतर त्यासंबंधीचा शासन निर्णय गेल्यावर्षी 23 सप्टेंबर 2023 रोजी झाला. शासन निर्णय सहा महिन्यांहून अधिक काळ होऊनही आकृत्तीबंध कार्यान्वित होऊन अंमलबजावणी होत नसल्याने कर्मचारी वर्गात अस्वस्थता पसरली असून नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. या साठीच संघटनेच्या वतीने सोमवार दि. 8 मे रोजी सकाळच्या सत्रात दोन तास लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय पदाधिकारी बैठकीत घेण्यात आला आहे.

कर्मचारी वर्गात संताप

विभागातील पदोन्नतीचे सत्र नाहक प्रलंबित ठेवले आहे, यामुळे कर्मचा-यांचे आर्थिक नुकसान होत असून, सेवाविषयक उन्नतीपासून वंचित ठेवले जात आहे, पात्र कर्मचा-यांवर हा अन्याय आहे. वर्ग – 2 ची पदे कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळेही कर्मचारी वर्गात संताप आहे. कामकाजात एकसूत्रता नसल्याने संघटनेने केलेल्या मागणी नंतर मा. कळसकर समितीचे गठण करण्यात आले, त्या समितीचा अहवाल सादर करुन दोन वर्षाहून अधिकचा काळ झाला आहे.

कर्मचारी संघटना तीव्र आंदोलन करणार

संपूर्ण राज्यात आरटीओच्या कामकाजात एकसूत्रता नसल्याने कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे कर्मचारी वर्गावर नाहक कारवाई होत असते. नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे. अहवालाची अंमलबजावणी त्वरीत करावी ही देखील मागणी प्रलंबित आहे. सरकारने मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांवर त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा तीव्र संघर्षाशिवाय पर्याय रहाणार नाही असा इशारा मोटार वाहन विभाग (RTO) कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी दिला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?