AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुपाली चाकणकरांचं पहिलं ट्विट; दोन पानी पत्र…, भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नेमकं काय घडतंय?

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत अनेक हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणात आता चाकणकर यांनी ट्विट केलं आहे.

रुपाली चाकणकरांचं पहिलं ट्विट; दोन पानी पत्र..., भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नेमकं काय घडतंय?
Rupali ChakankarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 20, 2026 | 8:44 PM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत अनेक हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या भोंदू अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचे या भोंदू बाबासोबतचे काही फोटो समोर आले आहेत, तसेच पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ देखील समोर आला. त्यामुळे चाकणकर या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत.  त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, असे आदेश काढल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता रुपाली चाकणकर यांचं पहिलं ट्विट समोर आलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या चाकणकर? 

‘आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले.’ असं चाकणकर यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान आपल्या या ट्विटसोबत त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना दिलेलं एक दोन पानांचं पत्र देखील जोडलं आहे. या पत्रामध्ये चाकणकर यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी- आरोपीचे समाजातील विविध स्तरांतील लोकांशी असलेले संबंध पहाता, तपासावर कोणताही राजकीय किंवा बाह्य दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन स्थपित व विशेष तपास पथक एसआयटी ने निपक्षपातीपणे तपास करावा.

पीडितेचे संरक्षण – सापडलेल्या 58 व्हिडीओंमधील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घेण्यात यावे आणि त्यांना आवश्यक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.

कठोर कायदेशीर कारवाई – आरोपीने जर डिजिटल पुरावे (व्हिडीओ) ब्लॅकमेलिंगसाठी वापरले असतील तर त्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत वाढीव कलमे लावून कडक कारवाई करण्यात यावी.

कालबद्ध तपास – सदर प्रकरणाचा तपास ठराविक कालमर्यादेत पूर्ण करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावे, पीडित महिलांना न्याय मिळेल.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाचा प्रगती अहवाल वेळोवेळी आयोगाला सादर करण्यास पोलीस आयुक्त नाशिक यांना कळवावे ही विनंती असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!