AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP News: सुनेत्रा पवारांवर टिका.. राष्ट्रवादीची महिला नेता संतापली! सुप्रिया सुळे- रोहित पवारांवर पलटवार

महिला लोकं प्रतिनिधींनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे,  असं राजकारणात आपण म्हणतो. पुण्यात तुमची वहिनी राज्याचा कारभार अत्यंत सक्षमपणे पेलत आहे. आपल्याच वहिनीवर आपल्या स्त्री शक्तीवर  हा संशय व्यक्त करणं चुकीचं आहे," असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. 

NCP News: सुनेत्रा पवारांवर टिका.. राष्ट्रवादीची महिला नेता संतापली! सुप्रिया सुळे- रोहित पवारांवर पलटवार
| Updated on: Nov 26, 2026 | 7:20 PM
Share

विनय जगताप, प्रतिनिधी: पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार अजित दादांप्रमाणे काम करत नाहीत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावरुन आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.  महिला लोकं प्रतिनिधींनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे,  असं राजकारणात आपण म्हणतो. पुण्यात तुमची वहिनी राज्याचा कारभार अत्यंत सक्षमपणे पेलत आहे. आपल्याच वहिनीवर आपल्या स्त्री शक्तीवर  हा संशय व्यक्त करणं चुकीचं आहे,” असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा निषेध…! 

“देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, या राज्याचे ऑलरेडी पालकमंत्री आहेत. सुप्रिया सुळे या दादांच्या बहिण आहेत, आणि सुनेत्रा पवार या त्यांच्या वहिनी आहेत. गुन्हेगारीवर कंट्रोल करणारा एकमेव नेता अजित पवार यांच्या तुम्ही भगिनी आहात आणि अजितदादांच्या अर्धांगिनी ह्या पुण्याच्या पालकमंत्री आहेत. इंदिरा गांधींकडून काय घेतलं तुम्ही? त्यांनी महिला असून पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीने भारत देश चालवला.. त्याच मातीमध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. ज्या महिलेचा पती जातो तिला विचारा, तिला सावरायला अख्ख आयुष्य जाते. हा वहिनींचा अवमान नाही तर हा आपल्या स्त्रियांचा अवमान आहे,” असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच “तुमचे काय वैचारिक मतभेद असतील त्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. दरवेळेस तुम्हाला पुरुष लोकप्रतिनिधित्व का हवय? आपण महिलासुद्धा सक्षम आहोत ना? तुम्ही म्हणाला असता 24 तास गृहमंत्री द्या तर आम्ही ॲग्री झालो असतो. सुप्रियाताई आणि सुनेत्रा पवार या दोघींनी मिळून दादांच्या वारसा प्रमाणे गुन्हेगारीच्या छाताडावर बसून ही गुन्हेगारी संपवायला पाहिजे, असंही रुपाली ठोंबरे पाटील पुढे बोलताना म्हणाल्या.

रोहित पवार यांनाही टोला..!

“दादांची जागा जशी सुनेत्रा वहिनी घेऊ शकत नाही तशी दादांची जागा रोहित पवार घेऊ शकत नाहीत. दादांची जागा सुप्रियाताईसुद्धा घेऊ शकत नाहीत. दादांच्या विचारांवर काम केलं पाहिजे, दादा 1001 टक्का खरा सोनं होते. सुप्रियाताई आणि रोहित पवार यांनी दादांसोबत अनेक वर्ष काम केलेल आहे, पण सुनेत्रा पवार यांच्यावर अचानक ही जबाबदारी आल्यानंतर सुद्धा त्या अत्यंत प्रभावशाली आपली भूमिका निभावत आहेत, गाडा हाकत आहेत. मग द्या ना साथ तुम्ही त्यांना. आपल्या दादाची अर्धांगिनी आहे ती, पवारांची सून आहे.. करून तर बघा एकदा.. वरून दादा तुम्हाला आशीर्वाद देतील,” असा टोला यावेळी त्यांनी रोहित पवार यांना लगावला.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला