AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War: रशिया यूक्रेन युद्धामुळे महाराष्ट्राच्या मनात धडकी, दीड हजार मुलं यूक्रेनमध्ये अडकली, पहा कोणत्या जिल्ह्यातून किती?

यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले जवळपास दीड हजार भारतीय विद्यार्थी या युद्धाच्या संकटात यूक्रेनमध्येच अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. हे विद्यार्थी रोमानिया, हंगेरीमार्गे भारतात परतणार आहेत. तर 300 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान रोमानियावरुन भारताकडे रवानाही झालं आहे.

Russia Ukraine War: रशिया यूक्रेन युद्धामुळे महाराष्ट्राच्या मनात धडकी, दीड हजार मुलं यूक्रेनमध्ये अडकली, पहा कोणत्या जिल्ह्यातून किती?
यूक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी भारतात आणण्यास सुरुवातImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 26, 2022 | 6:59 PM
Share

मुंबई : रशियाने यूक्रेनवरील जोरदार हल्ले (Russia Ukraine War) सुरुच ठेवलेत. तर यूक्रेनकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. दुसरीकडे युद्ध रोखण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलदीमीर झेलेन्स्की यांनी जगभरातील देशांना मदतीसाठी आवाहन केलं आहे. वोलदीमीर झेलेंस्की (Volodymyr Zelensky) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याशीही चर्चा करत युद्धस्थितीची माहिती दिली आणि मदतीची मागणीही केली आहे. अशावेळी यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले जवळपास दीड हजार भारतीय विद्यार्थी या युद्धाच्या संकटात यूक्रेनमध्येच अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. हे विद्यार्थी रोमानिया, हंगेरीमार्गे भारतात परतणार आहेत. तर 300 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान रोमानियावरुन भारताकडे रवानाही झालं आहे.

कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले?

  1. पुणे – 77
  2. ठाणे – 11
  3. पालघर – 7
  4. जळगाव – 5
  5. बीड – 2
  6. सिधुदुर्ग – 6
  7. य़वतमाळ – 2
  8. परभणी – 6
  9. अहमदनगर – 26
  10. जालना – 7
  11. अमरावती – 8
  12. बुलडाणा – 6
  13. चंद्रपूर – 6
  14. गडचिरोली – 2
  15. अकोला – 4
  16. सोलापुर – 10
  17. उस्मानाबाद – 11
  18. भंडारा – 4
  19. नागपूर – 5
  20. गडचिरोली – 2
  21. वर्धा – 1
  22. गोंदिया – 3
  23. सातारा – 7
  24. हिंगोली – 2
  25. नागपूर – 5
  26. औरंगाबाद – 7
  27. नांदेड – 29
  28. लातुर – 28
  29. रायगड – 26
  30. रत्नागिरी – 8
  31. सिंधुदूर्ग – 6
  32. धुळे – 0
  33. जळगाव – 9
  34. नाशिक – 7
  35. कोल्हापुर – 5
Students GFX

युक्रेनमध्ये कोणत्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी अडकले?

राज्य सरकारकडून हेल्पलाईन जारी

दरम्यान, यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील (Maharashtra) तब्बल 1 हजार 200 विद्यार्थी अडकल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याकडून (Disaster Management Department) देण्यात आली आहे. यातील 300 विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांशी संपर्क झाल्याचंही सरकारने सांगितलं. तसंच यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी राज्य सरकारकडून हेल्पलाईनही जारी करण्यात आलीय.

राज्यातील अंदाजे 1 हजार 200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत, त्यातील ३०० विद्यार्थ्यांशी पालकांचा संपर्क झाला. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात ‘राज्य नियंत्रण कक्ष’ असून विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. तसंच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती राज्याचा नियंत्रण कक्ष 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9321587143 आणि controlroom@maharashtra.gov.in या ईमेलवर द्यावी. तसेच जिल्हास्तरावर देखील हेल्पलाईन क्रमांक जाहीर केलेले आहेत, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

Russia Ukraine War Video: रशियानं मिसाईल डागलं, कानठळ्या बसवणारा आवाज पण तरीही मजबूतीचं दुसरं नाव यूक्रेन

NATO कडून युक्रेनचा विश्वासघात: माझा युक्रेन हा एकटा लढतोय; राष्ट्राध्यक्षांचे भावनिक उद्गगार…

Video : रशियन टँकनं अचानक ट्रॅक बदलला, समोरुन आलेल्या कारला चिरडलं, नेमकं काय घडलं?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.