AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NATO कडून युक्रेनचा विश्वासघात: माझा युक्रेन हा एकटा लढतोय; राष्ट्राध्यक्षांचे भावनिक उद्गगार…

रशिया-युक्रेन युद्ध वेगाने वाढत असतानाच आता एक नवा वाद उफाळून आला आहे. या लढ्याचे मूळ नाटो आहे, आणि त्या नाटोमध्ये युक्रेनला सामील व्हायचे होते पण रशियाने मात्र त्याला ठाम विरोध दर्शविला होता.

NATO कडून युक्रेनचा विश्वासघात: माझा युक्रेन हा एकटा लढतोय; राष्ट्राध्यक्षांचे भावनिक उद्गगार...
ukraine russia blastImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 4:45 PM
Share

मुंबईःरशिया आणि युक्रेनचे युद्ध आता भयंकरतेच्या पातळीवर जाऊन पोहचले आहे. रशियाकडून युक्रेनच्या (Russia-Ukraine) राजधानीवर सतत हल्ले केले जात आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी रशियन सैनिक युक्रेनमध्ये घुसले आहे त्या त्या ठिकाणी प्रचंड धुमचक्री आणि गोळीबार सुरु आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचा या गोळीबारामध्ये मृत्यू झाला आहे. जेव्हा परवाच्या रात्री सगळं जग झोपेच्या आधीन होतं त्यावेळी रशियाकडून युक्रेनच्या राजधानी कीवसह (Capital Kyiv) अन्य शहरावर क्षेपणास्त्रांच्या (Missile) हल्ले केले जात होते. आणि या हल्ल्यातून वाचण्यासाठी युक्रेनमधील नागरिक जीवाच्या आकांताने सैरभैर धावत होते.

हा हल्ला सुरु झाल्यानंतर युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा आठवण सांगताना म्हणतात की, 1941 मध्ये जेव्हा जर्मनीतील नाझीवाद्यांकडून असे हल्ले केले गेले त्यावळी त्यांचा पराभव युक्रेनने केला होता, आणि आताही या वाईट गोष्टींचा पराभव युक्रेनकडून नक्की केला जाईल असा विश्वास दिमित्रो कुलेबा यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती झेलेन्स्की हताश

या युद्धकाळात युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हताश असल्याचे दिसत आहे. ते हताशपणे सोशल मीडियाचा वापर करत आपल्या देशातील नागरिकाना बळ देण्याचे काम करत आहेत. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर करुन सैनिक आणि देशातील सामान्य नागरिकांना या संकटाला धैर्याने सामोरे जाऊ या म्हणत ते धीर देत आहेत. या युद्धात युक्रेन लढत राहणार आणि तो हारही मानणार नाही असा संदेश ते सोशल मीडियावरुन देत आहेत.

युवकांनो! लढ्यात सहभागी व्हा

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, रशियाने पहिल्यांदा मला टार्गेट केले आहे आणि दुसरा क्रमांकावर माझे कुटुंबीय आहेत. त्यामुळे या युद्धात युक्रेनच्या नागरिकांनी सहभागी व्हावे असा संदेश त्यांनी दिला आहे. युक्रेनच्या नागरिकांनी देश सोडून जाऊ नये, त्यामुळे 18-60 या वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्यांना देशाचे संरक्षण करायचे आहे, त्यांनी या लढ्यात सहभागी व्हा आणि लढा द्या, त्यासाठी सरकार तुम्हाला शस्त्रे पुरवत आहे.

लष्कर आणि नागरिक लक्ष्य होत आहेत

तर झेलेन्स्कींनी दुसर्‍या एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, रशियाने अखंड युक्रेनवर हल्ला करुन संरक्षण दलाला आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य बनवले आहे. यावेळी त्यांनी नाटो (NATO नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन), EU (युरोपियन युनियन) आणि अमेरिकेकडून झालेल्या फसवणुकीची गोष्टही त्यांनी सांगितली आहे. गेल्या काही दिवसांपासून जी अमेरिका मदतीची घोषणा करत होती, ज्यांनी सांगितले तुमच्या सीमारेषेवर लाखो रशियन सैनिक तैनात केले गेले आहे, आणि ते तुमच्यावर कधीही हल्ला करु शकेल असं फक्त हे सांगत राहिले मात्र काही केले नाही, हातावर हात ठेऊन शांत बघत बसले. एक प्रकारे ही या पाश्चिमात्य राष्ट्रांनी युक्रेनवर फक्त अश्वासनांची खैरात केली आहे, आणि ज्या वेळी युक्रेन युद्ध संकटात सापडला त्यावेळी या पाश्चिमात्य राष्ट्रांनी त्याला एकटे सोडून दिले आहे.

माझा देश युक्रेन हा एकटा लढतोय

रशियाकडून होत असलेल्या सततच्या हल्लामुळे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी शुक्रवारी एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, जेव्हापासून रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केला तेव्हापासून माझा देश युक्रेन हा एकटा लढत आहे. जगात सगळ्यात बलाढ्य असणाऱ्या शक्तीही आमच्यापासून दूर गेल्या आहेत.

कोणतेही राष्ट्र युद्धाच्या तयारीत नाही

झेलेन्स्की यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांवर टीका करताना म्हणतात की, ज्या वेळी रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्यावेळी पाश्चिमात्य राष्ट्रांकडून कोणतीही मदत करण्यात आली नाही. या युद्धात युक्रेनला एकटे पाडले गेल. आमच्या देशाबरोबर कोण युद्ध करणार आहे, तर कोणतेही राष्ट्र युद्धाच्या तयारीत नाही.

देशाकडे भीक मागत होता मात्र पण…

युक्रेनियन आणि काही आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी नाटोने युक्रेनला धोका दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे युक्रेनच्या संकटात वाढ होत आहे. तर एका आंतरराष्ट्रीय निरीक्षकाने म्हटले आहे की, येणाऱ्या वर्तमान काळात पाश्चिमात्य देश हे हताश झालेले असणार आहेत, तरीही काही पाश्चिमात्य राष्ट्ं ही चुकीच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यवहार करत आहेत. युद्ध काळात युक्रेनच्या मदतीसाठी न जाता माध्यमांचा वापर करुन फक्त प्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर एका युक्रेनियन विश्लेषकाने सांगितले आहे की, युक्रेन गेल्या काही दिवसांपासून हवाई मार्गांपासून आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी लष्करी विमानांची इतर देशाकडे भीक मागत होता मात्र पण ती मिळाली नाही, इतर देशांकडून मिळाली ती फक्त अश्वासनांची खैरात.

व्लादिमीर पुतिन यांनाही धोका

रशियाने केलेल्या हल्ल्याचे विश्लेषण करताना काही अभ्यासकांच्या मते, नाटोने एक प्रकारे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन यांनाही धोका दिला आहे, म्हणूनच सध्या युक्रेन युद्धसंकटाच्या खाईत आहे. 1990 मध्ये नाटोने स्पष्ट केले होते की, युरोपमधील जी रशियाच्या प्रभावाखाली जी राष्ट्रं आहेत, तिथे आम्ही प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले होते.त्यानंतर रशियाच्या शेजारील राष्ट्रांसह 14 युरोपीय राष्ट्रांचा त्यामध्ये समावेश करण्यासाठी विस्तार करण्यात आला. रशिया, युक्रेन आणि पूर्व युरोपातील इतर काही देश सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक (USSR) च्या फेडरेशनच्या अंतर्गत “भाऊ-बहिणी” सारखे होते आणि रशिया त्यांचा मोठा भाऊ असल्यासारखा आपली भूमिका बजावत होता.

रशियाः जगातील दोन नंबरचा शक्तिशाली

युएसएसआरचे 26 डिसेंबर 1991 मध्ये जेव्हा विघटन झाले तेव्हा आर्मर कार, ड्रोन, अण्वस्त्रे, जैविक शस्त्रे हे सर्व माजी सोव्हिएत युनियनच्या सदस्यांना देण्यात आली. या सगळ्यात जास्त आणि महत्वाचा वाटा होता तो रशियाचा. दरवर्षी रशियाने आपल्या अण्वस्त्रे आणि जैविक शस्त्रसाठा वाढविण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले. त्यामुळे रशिया जगातील दोन नंबरचा शक्तिशाली देश म्हणून जगासमोर आला. त्यामुळे आता बेलारुसशिवाय रशियावर कोणताही देश प्रेम दाखवू शकत नाही.

युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळावे असे रशियाला वाटत नाही. कारण रशियाला माहिती आहे की, युक्रेनला जर नाटोचे सदस्यत्व मिळाले तत रशियाचा सर्वात मोठा शत्रू अमेरिका तेथे शस्त्रे आणि हेरगिरीची उपकरणे तैनात करून त्यावर लक्ष ठेवेल. नाटो, अमेरिका आणि युरोपियन युनियनचे वर्तन पाहून एकतर मैत्री करू नका आणि कराल तर भ्याड बनू नका, असे सांगितले जात आहे. हे बुद्धिबळाच्या खेळासारखे आहे.

नाटोमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न

ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना इजा होणार नाही, त्यांना एकतर पकडले जाईल किंवा राजीनामा देण्यास भाग पाडले जाणार आहे. ज्या झेलेन्स्कीने प्रत्येक वेळी नाटोमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न केला, नाटोही फक्त गोड बोलत राहिला की, कोणत्याही परिस्थितीत युक्रेनला साथ देणार म्हणून. मात्र ज्यावेळी सदस्यत्व देण्याचा विषय आला तेव्हा तो बरोबर टाळण्यात आला.आणि या गोष्टीला अमेरिकाही तेवढीच जबाबदार आहे.

युक्रेनच्या मदतीसाठी आता कुणीच नाही

2019 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून झेलेन्स्की यांनी सांगितले होते की, आम्हाला नाटोमध्ये सामील करुन घ्या. त्यासाठी त्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांबरोबर आपले संबंध दृढ केले. मात्र ज्यावेळी युक्रेनला मदत करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणतेच राष्ट्र त्यांच्या बाजूनं उभा राहिलं नाही. रशियावर फक्त निर्बंध लादण्याचं काम करण्यात आले. तर अमेरिकेने आपले सैन्य पाठवण्यास पूर्ण पणे नकार दिला. नाटोने या प्रदेशातील इतर देशांमध्ये तैनातीसाठी सैन्य पाठवले आणि युक्रेनला केवळ आर्थिक आणि शस्त्रांची मदत करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचा मोठा फटका युक्रेनाला बसला आहे.

संबंधित बातम्या

Russia Ukraine War Video: आम्ही हत्यार नाही सोडणार, देश सोडून गेल्याच्या अफवांवर यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाचं सडेतोड उत्तर, याला म्हणतात नीडर लीडर

युक्रेनच्या राजधानीत धुमचक्री सुरुच, रशियन सैनिकांकडून हवाई पट्ट्या काबीज करण्याचा प्रयत्न, युक्रेन प्रशासनाचे नागरिकांना बाहेर न पडण्याचा सल्ला

Shocking video viral : केवळ अमानवी..! रशियन रणगाडा युक्रेनियन कारवर घुसला आणि…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.