जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण जगात नंबर वन ? रशियन मुलगा जिल्हा परिषद शाळेत दाखल

कोकणात फिरायला आलेल्या रशियातील जोडप्याचा मुलगा मिरॉन याला चक्का जिल्हा परिषदेची शाळा आवडली. मिरॉन सध्या या शाळेत चक्क मराठीचे धडे घेतोय. त्याला चक्का मराठी शाळेचा लळा लागलाय

जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण जगात नंबर वन ? रशियन मुलगा जिल्हा परिषद शाळेत दाखल
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 3:30 PM

सिंधुदुर्ग : आपल्या मुलाला इंग्रजी फडाफड बोलता यावे म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेंचे पेव फुटले आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढल्या आहेत अन् मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. मराठी माध्यमातून ते ही जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून रघूनाथ माशेलकर यांच्यासारखे व्यक्त जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाले आहे. आपल्या समोर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलेले माशेलकर यांच्यासारखे अनेक आदर्श असताना इंग्रजी शाळांची क्रेझ कमी होत नाही. परंतु रशियान मुलास याच जिल्हा परिषदेच्या शाळेने भुरळ घातली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षण जगात अव्वलच असल्याचे सिद्ध होत आहे.

रशियाचा विद्यार्थी मराठी शाळेत

कोकणात फिरायला आलेल्या रशियातील जोडप्याचा मुलगा मिरॉन याला चक्का जिल्हा परिषदेची शाळा आवडली. मिरॉन सध्या या शाळेत चक्क मराठीचे धडे घेतोय. त्याला चक्का मराठी शाळेचा लळा लागलाय. गेले महिनाभर मिरॉन येथील मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेतो. वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये रमतो आहे. मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा कोणताही अडसर त्याला जाणवत नाही.

का आले भारतात

हे सुद्धा वाचा

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु आहे. लुकेशिवी कुटुंबीय रशियातून भारतात भटकंतीसाठी आले. कोकणात फिरत असताना लुकेशीवी यांचा मुलगा मिरॉन ॲलेगेविज लुकेशिवी याला जिल्हा परिषदेची शाळा चांगलीच आवडली. त्याने या शाळेत शिकण्याचा निर्णय घेतला. सिंधुदुर्गमधील सावंतवाडीच्या आजगावमधील ही शाळा आहे.

miron

miron

व्हिसा संपल्यावर जाणार

पर्यटनाच्या व्हिसावर आलेल्या लुकेशिवी कुटुंबीय चार महिन्यानंतर परत रशियाला जाणार आहे. परंतु पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच परत येईन, असा विश्वास देखील मिरॉन व्यक्त करतो. त्याची भारतीय भाषा शिकण्याची आवड बघून त्याला जिल्हा परिषद शाळेत तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे.

शाळेत रमला मिरॉन सध्या शाळेमध्ये चांगलाच रमला आहे. तो मराठी देखील बोलतो. त्यासोबतच स्थानिक मुलांसोबत त्याची चांगलीच गट्टी जमली आहे. यामुळे शिक्षक त्याचे चांगले कौतूक करताहेत.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.