Video : संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरात राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते महापूजा: कीर्तनात सहभागी होत टाळही वाजवला!

संत ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी होऊन गेले असे वाटत नाही. त्यांची शिकवण आज ही उपयोगी पडत आहे, असं मत कोश्यारी यांनी माऊलींच्या दर्शनानंतर व्यक्त केले. माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या कोश्यारी यांनी या वेळी मंदिरात सुरू असलेल्या कीर्तनात सहभागी होऊन टाळ वाजवण्याचाही आनंद ही लुटला.

Video : संत ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरात राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते महापूजा: कीर्तनात सहभागी होत टाळही वाजवला!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून आळंदीत माऊलींच्या समाधीचे दर्शन
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 9:06 PM

पुणे : आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (Saint Dnyaneshwar Maharaj) समाधी मंदिरात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे बोधचिन्ह प्रकाशित केले. संत ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी होऊन गेले असे वाटत नाही. त्यांची शिकवण आज ही उपयोगी पडत आहे, असं मत कोश्यारी यांनी माऊलींच्या दर्शनानंतर व्यक्त केले. माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या कोश्यारी यांनी या वेळी मंदिरात सुरू असलेल्या कीर्तनात सहभागी होऊन टाळ वाजवण्याचाही आनंद ही लुटला. आळंदी मध्ये कार्तिकी संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. 2 डिसेंबरला आळंदीत माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे.

संजीवन समाधी सोहळ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात

आळंदी मध्ये कार्तिकी संजीवन समाधी सोहळ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधीदिन सोहळा संपन्न होत आहेत. यंदाचे सोहळ्याचे हे 725 वर्ष आहे. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. दोन वर्षानंतर इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेला आहे. या कार्तिकी एकादशीच्या सोहळासाठी नगरपालिका, देवस्थान, पोलीस प्रशासनांकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीपलीकडील जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे.

श्रींच्या संजीवन समाधी सोहळ्याला श्रीगुरु हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने सुरुवात

माऊलींच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातील श्रींच्या संजीवन समाधी सोहळ्याला श्रीगुरु हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने हरिनाम गजरात उत्साहात सुरुवात झाली. त्यावेळी राज्यातून आलेले भाविक आळंदीत उपस्थित होते. दरम्यान, राज्यातून विविध संतांच्या दिंड्या जयघोष करत दाखल झाल्या. दिंड्यांनी प्रदक्षिणा करत मुक्कामाचे ठिकाण गाठले. माऊली नाम गजरात हैबतबाबा पायरी पूजन, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप, दिंडीची मंदिर प्रदक्षिणा तसंच सोहळ्याचे परंपरेप्रमाणे नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रम झाले.

यावेळी हैबतबाबा यांचे प्रतिनिधी वंशज पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरऱळकर यांच्या हस्ते पायरी पूजन करण्यात आले. या वेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, यांनी पायरी पूजन प्रसंगी मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला. या निमित्त आरती, महानैवेद्यही वाढविण्यात आला.

इतर बातम्या :

देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, लॉकडाऊनचे निर्बंध लादण्याचा कोणताही निर्णय नाही: राजेश टोपे

‘मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच’, बच्चू कडूंचा घरचा आहेर