Nagpur : सलील देशमुख ऑनफिल्ड, गुडघाभर पाण्यात उतरत घेतला पूर परिस्थितीचा आढावा

| Updated on: Aug 10, 2022 | 1:32 PM

सध्या अनेक नेत्यांकडून पूर परिस्थितीची पहाणी करून, नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे.  अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी देखील पूरग्रस्त भागात जाऊन पहाणी करत नागरिकांना दिलासा दिला. 

Nagpur : सलील देशमुख ऑनफिल्ड, गुडघाभर पाण्यात उतरत घेतला पूर परिस्थितीचा आढावा
Follow us on

नागपूर : जून,जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर (Rain) ऑगस्टच्या सुरुवातीला राज्यात पावसाने दडी मारली होती.  मात्र आता पुन्हा एकदा राज्यभरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर (flood) आला आहे. पुराचा फटका लाखो लोकांना बसला असून, अनेकांवर स्थलांतरणाची वेळ आली आहे. नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके पण्यात गेल्याने बळी राजा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. विदर्भात तर पावसामुळे परिस्थिती आणखी भीषण बनली आहे. विदर्भातील अनेक गावाना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान सध्या अनेक नेत्यांकडून पूर परिस्थितीची पहाणी करून, नागरिकांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे.  अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी देखील पूरग्रस्त भागात जाऊन पहाणी करत नागरिकांना दिलासा दिला.

पूरपरिस्थितीचा आढावा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांचे चिरंजीव सलील देशमुख थेट ऑनफिल्ड दिसले. त्यांनी नागपूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. सलील देशमुख यांनी काटोल परिसरात गुडघाभर पण्यात उतरून पूर परिस्थितीची पहाणी केली. काटोल परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तेथील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. नदी, नाल्यांना पूर आला आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे. सलील देशमुख यांनी काटोल परिसराला भेट देऊन पुराची पहाणी केली. स्थानिकांना त्यांनी धीर दिला.

हे सुद्धा वाचा

राज्यभरात पावसामुळे मोठे नुकसान

जून आणि जुलैमध्ये राज्यात जोरदार पाऊस झाला या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीला पवासाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. आणखी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. नदी नाल्यांना आलेल्या पुराचा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. तर विविध दुर्घटनेमध्ये काही जणांना आपला जीव देखील गमावावा लागला आहे.