AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE : मराठवाड्याच्या राजधानीत गड कोण राखणार? खिचडी की एकहाती सत्ता येणार?

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक जाहीर केल्यानंतर अखेर मराठवाड्याच्या राजधानीत मतदान पार पडलं. तर आज या महापालिकेचा निकाल जाहीर होत आहे. यावेळी दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादीसह भाजप,काँग्रेस,एमआयएम मैदानात आहेत. त्यामुळे या शहरात कुणाचा महापौर होईल याची चर्चा रंगली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE : मराठवाड्याच्या राजधानीत गड कोण राखणार? खिचडी की एकहाती सत्ता येणार?
छत्रपती संभाजीनगर महापालिकाImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:05 AM
Share

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील सर्वात मोठी महापालिका छत्रपती संभाजीनगरमध्ये 2020 नंतर मोठ्या अंतराने निवडणूक प्रक्रिया पार पडली. आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या महापालिकेत मध्यंतरी एमआयएमचे मोठे वादळ आले. यावेळी शिवसेनेची दोन शकलं झाली आहेत. तिकडं राष्ट्रवादीतही दोन गट आहेत. यावेळी महापालिकेत समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम आता उद्या सर्वांसमोर येईल. भाजप यंदा खेळी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्याच्या निकालात भाजपने किती घोडे दामटले हे समोर येईल. काल झालेल्या मतदानाचा आकडा कुणाच्या पदरात कौल टाकतो.

गेल्यावेळी शिवसेना-भाजपची सत्ता

2015 मध्ये शिवसेनेला 29 आणि भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या.महायुतीला 51 जागांवर विजय मिळाला होता. तर एमआयएमने मुसंडी मारत 25 जागा खिशात घातल्या होत्या. काँग्रेस 10, राष्ट्रवादी 3, बसप 5, रिपब्लिकन पक्ष 1 तर 18 अपक्ष निवडून आले होते. गेल्यावेळी 113 प्रभागांसाठी 62 टक्के मतदान झाले होते. शिवसेना आणि एमआयएममधील लढाईने सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी मात्र सर्वच गणितं बिघडली आहेत.तर सध्याच्या महायुतीला लोकसभा, विधानसभेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये हॅट्रिकची संधी असल्याची चर्चा आहे. उद्याच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल.

यंदा 115 नगरसेवक, 29 प्रभाग

यंदा 115 नगरसेवक निवडण्यासाठी 29 प्रभाग तयार करण्यात आले होते. यातील एक शेवटचा प्रभाग 3 सदस्यांचा आहे. गेल्यावेळेचे आरक्षणच लागू असल्याने यावेळी 55 जागा आरक्षीत होत्या. 2015 मध्ये 113 वॉर्डासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर सातारा-देवळाईचा भाग मनपात समाविष्ट करण्यात आला. या भागातून दोन सदस्य निवडून आले होते. त्यामुळे मनपा सदस्यांची संख्या यावेळी 115 इतकी आहे.

2011 च्या जनगणनेनुसार, 2012 मध्ये शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 इतकी होती. या निवडणुकीसाठी सुद्धा हीच लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे आरक्षणात काहीच बदल झालेला नाही. या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी 31 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर एसटी प्रवर्गासाठी दोन जागा आहेत. एससी प्रवर्गासाठी 22 जागा आहेत. महापालिकेत एकूण 55 जागा आरक्षित आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 30 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 16 महिला, एसटीसाठी 1 महिला, तर एससी प्रवर्गासाठी 11 महिलांसाठी जागा राखीव आहेत.

प्रभाग 1 मध्ये एकूण लोकसंख्या 41,080 इतकी आहे. यामध्ये फुलेनगर,खत्रीनगर,जमनज्योती,भगतसिंगनगर, म्हसोबानगर, बेरीबाग,साफल्यनगर,घृष्णेश्वर कॉलनी,एकतानगर,जहांगीर कॉलनी,राधास्वामी कॉलनी, चेतनानगर, सारा वैभव,राजनगर, हर्सूल,जय महाराष्ट्र नगर,म्हाडा कॉलनी, सईदा कॉलनीचा समावेश आहे. तर अखेरचा प्रभाग क्रमांक 29 मध्ये एकूण लोकसंख्या 29,149 इतकी आहे. यामध्ये एमआयटी कॉलेज परिसर, कासलीवाल मार्वेल,शीतल नगर, गादिया विहार, सातारा गाव, शंकर नगर, अभिनंदन सोसायटी, ऑरेंज सिंटी, कांचनवाडी,संताजी धनाजी नगर,नक्षत्रवाडी, ईटखेड्यासह इतर परिसर आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवारपक्ष

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.