
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील सर्वात मोठी महापालिका छत्रपती संभाजीनगरमध्ये 2020 नंतर मोठ्या अंतराने निवडणूक प्रक्रिया पार पडली. आतापर्यंत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या महापालिकेत मध्यंतरी एमआयएमचे मोठे वादळ आले. यावेळी शिवसेनेची दोन शकलं झाली आहेत. तिकडं राष्ट्रवादीतही दोन गट आहेत. यावेळी महापालिकेत समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम आता उद्या सर्वांसमोर येईल. भाजप यंदा खेळी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्याच्या निकालात भाजपने किती घोडे दामटले हे समोर येईल. काल झालेल्या मतदानाचा आकडा कुणाच्या पदरात कौल टाकतो.
गेल्यावेळी शिवसेना-भाजपची सत्ता
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
2015 मध्ये शिवसेनेला 29 आणि भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या.महायुतीला 51 जागांवर विजय मिळाला होता. तर एमआयएमने मुसंडी मारत 25 जागा खिशात घातल्या होत्या. काँग्रेस 10, राष्ट्रवादी 3, बसप 5, रिपब्लिकन पक्ष 1 तर 18 अपक्ष निवडून आले होते. गेल्यावेळी 113 प्रभागांसाठी 62 टक्के मतदान झाले होते. शिवसेना आणि एमआयएममधील लढाईने सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी मात्र सर्वच गणितं बिघडली आहेत.तर सध्याच्या महायुतीला लोकसभा, विधानसभेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये हॅट्रिकची संधी असल्याची चर्चा आहे. उद्याच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल.
यंदा 115 नगरसेवक, 29 प्रभाग
यंदा 115 नगरसेवक निवडण्यासाठी 29 प्रभाग तयार करण्यात आले होते. यातील एक शेवटचा प्रभाग 3 सदस्यांचा आहे. गेल्यावेळेचे आरक्षणच लागू असल्याने यावेळी 55 जागा आरक्षीत होत्या. 2015 मध्ये 113 वॉर्डासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर सातारा-देवळाईचा भाग मनपात समाविष्ट करण्यात आला. या भागातून दोन सदस्य निवडून आले होते. त्यामुळे मनपा सदस्यांची संख्या यावेळी 115 इतकी आहे.
2011 च्या जनगणनेनुसार, 2012 मध्ये शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 इतकी होती. या निवडणुकीसाठी सुद्धा हीच लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. यामुळे आरक्षणात काहीच बदल झालेला नाही. या निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी 31 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर एसटी प्रवर्गासाठी दोन जागा आहेत. एससी प्रवर्गासाठी 22 जागा आहेत. महापालिकेत एकूण 55 जागा आरक्षित आहेत. यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी 30 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 16 महिला, एसटीसाठी 1 महिला, तर एससी प्रवर्गासाठी 11 महिलांसाठी जागा राखीव आहेत.
प्रभाग 1 मध्ये एकूण लोकसंख्या 41,080 इतकी आहे. यामध्ये फुलेनगर,खत्रीनगर,जमनज्योती,भगतसिंगनगर, म्हसोबानगर, बेरीबाग,साफल्यनगर,घृष्णेश्वर कॉलनी,एकतानगर,जहांगीर कॉलनी,राधास्वामी कॉलनी, चेतनानगर, सारा वैभव,राजनगर, हर्सूल,जय महाराष्ट्र नगर,म्हाडा कॉलनी, सईदा कॉलनीचा समावेश आहे. तर अखेरचा प्रभाग क्रमांक 29 मध्ये एकूण लोकसंख्या 29,149 इतकी आहे. यामध्ये एमआयटी कॉलेज परिसर, कासलीवाल मार्वेल,शीतल नगर, गादिया विहार, सातारा गाव, शंकर नगर, अभिनंदन सोसायटी, ऑरेंज सिंटी, कांचनवाडी,संताजी धनाजी नगर,नक्षत्रवाडी, ईटखेड्यासह इतर परिसर आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
|---|---|---|
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE