Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: जालना रोडच्या पल्याड कुणाचं पारड जड? या प्रभागात कोणता पक्ष बाजी मारणार? एका क्लिकवर जाणून घ्या
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : जालना रस्त्याच्या पल्याड शिवसेना भाजपच्या आमदारांची मजबूत पकड आहे. हा भाग विविध चळवळींचं केंद्रही ठरला आहे. श्रीमंत आणि गरीब, व्यापारी आणि नोकरदार अशी सरमिसळ असलेल्या या प्रभागात कुणाचं कार्ड चालणार?

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये 1990 नंतर अनेक बदल झाले. जालना रोडच्या पल्याड वसाहत वाढू लागली. या शांत परिसरात मोठा बदल झाला. अनेक वसाहती झाल्या आता तर हा परिसर कायम गजबजलेला असतो. शहरातील सांस्कृतिक, सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक बदलाची नांदी अंगावर झेलत अनेक चळवळींना या पट्ट्यानं समृद्ध केलं आहे. विविध पक्षांना अंगाखांद्यावर मोठं केलेला हा परिसर आहे. जुन्या शहरानं जसं शिवसेना, वंचित चळवळ, पक्षांना डोक्यावर घेतलं. तसचं या परिसराने शिवसेनाचा झंझावत, भाजपची पाळंमुळं मजबूत करण्यात आणि वंचित पक्षांना, चळवळींना मोठं करण्यात हातभार लावला. आता या बदलत्या वसाहतींची मतं कुणाच्या पारड्यात पडणार हे थोड्याच वेळात समोर येईल. मोठा बदल घडेल का, की प्रस्थापितांना पुन्हा संधी मिळेल हे लवकरच समोर येईल.
शहरातील 29 प्रभागात 115 नगरसेवक निवडून येणार आहेत. यावेळी 2015 पेक्षा दोन जागा वाढल्या आहेत. यावेळी शहराच्या राजकारणात दोन पक्षांचा भरणा वाढला आहे. शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीची या राजकारणात एंट्री झाली आहे. तर एमआयएम गेल्या दहा वर्षांपासून शहराच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बदलवत आहेत. यावेळी प्रचारात या मुद्यावर ज्यांनी आश्वासनांचा पाऊस पडला. त्यांचं पारडं जड भरत की, नवीन दमाच्या उमेदवारांना संधी मिळते हे आता समोर आलं आहे.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 18
42,735 इतकी या प्रभागाची लोकसंख्या आहे. या प्रभागाची सुरुवात अदालत रोड, महावीर चौकापासून सुरू होते. यामध्ये पदमपुरा, रामलाल कॉलनी, सुयोग कॉलनी, जगजीवन रामगृह निर्माण संस्था, शिल्पनगर, गांधीनगर, कोकणवाडी, क्रांतीनगर,स्नेहनगर, जुनी उच्च न्यायालयाची इमारत, वेदांत नगर, बन्सीलाल नगर, रामनगर, विवेकानंदनगर, नवयुग कॉलनी, आदर्श नगर, शाहुनगर, पगारिया कॉलनी,मगरबी कॉलनी, जहागीरदार कॉलनी, जालन नगर यांचा समावेश आहे.
प्रभाग क्रमांक 19
प्रभाग क्रमांक 19 ची लोकसंख्या 40,699 इतकी आहे.या प्रभागात रामनगर, क्रांती चौक, पन्नालाल नगर, संत एकनाथ रंग मंदिर, श्रेयनगर, झांबड इस्टेट, रोहिणी नगर, राठी कॉम्प्लेक्सनगर, रामानंद कॉलनी, दशमेश नगर, ज्योती नगर, देवानगरी, प्रशांत नगर, प्रताप नगर, भीमाशंकर कॉलनी, दिशा नगरी, शिवकृपा कॉलनी, राजगुरुनगर, शहानुरवाडी, मयूरबन कॉलनी, केशव नगर, शांकुतल नगर, शंभू नगर, विभागीय क्रीडा संकूल, इंदिरा नगरचा काही भाग, गुरकुल स्कूल सोसायटी, पाल्म लीव्हस सोसायटीचा भाग आहे.
प्रभाग क्रमांक 20
या प्रभागाची लोकसंख्या 45,274 इतकी आहे. या प्रभागात कुशलनगर, सिंधी कॉलनीा भाग, रणजीत नगर, बालाजी नगर, शिवशंकर कॉलनी, टिळक नगर, जय विश्वभारती कॉलनी, रवींद्र नगर, न्यू बालाजी नगर, बौद्ध नगर, उत्तम नगर, नाथ नगर, पंचशील नगर, ज्ञानेश्वर नगर, तिरुपती पार्क, मयुरबन कॉलनी, केशवनगरी,राजनगर,शाकुंतल नगर, म्हाडा कॉलनी, देशपांडेपूरम, मोरेश्वर सोसायटीचा काही भाग येतो.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
|---|---|---|
प्रभाग क्रमांक 21
या प्रभाग क्रमांक 21 ची एकूण लोकसंख्या 40,853 इतकी आहे. या प्रभागात विष्णूनगर, सिंधी कॉलनीचा काही भाग, लिमये वाडी, अरिहंत नगर, जवाहर कॉलनी, सारंग सोसायटी, भानुदास नगर, न्यू शांतिनिकेतन कॉलनी, शास्त्रीनगर, भगवती कॉलनी, उल्कानगरीचा काही भाग, कडा कार्यालय, शिवनेरी कॉलनी, लोक मित्र कॉलनी, रामकृष्ण नगर, काबरा नगर, मोरेश्वर सोसायटी, काबरा नगर, उल्कानगरी, हनुमान नगर, सहयोग नगर, खिवंसरा नगर, आदित्य नगर, वेलकम नगर परिसर येतो.
प्रभाग क्रमांक 22
प्रभाग क्रमांक 22 ची एकूण लोकसंख्या 46,673 इतकी आहे. या प्रभागात विद्यानगर, गिरीजादेवी कॉलनी, परिमल सोसायटी, अलंकार कॉलनी, नंदिग्राम कॉलनी, गजानन कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, चैतन्य सोसायटी, भूषण नगर, न्याय नगर, हुसैन कॉलनी, दुर्गा माता कॉलनी, चौधरी कॉलनी, पुंडलिक नगर, मातोश्री नगर, गजानन नगर, स्पंदन नगर, गणेश नगर, भारत नगर, गुरुदत्त नगर, छत्रपती नगर, मेहर नगर, मानक नगरचा समावेश आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
