AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोलायला लावू नका, नाही तर… संजय शिरसाट यांनी एका वाक्यात विषय संपवला; राऊतांवर हल्लाबोल

Sanjay Shirsat on Sanjay Raut : 'नरकातील स्वर्ग' हे संजय राऊत यांचे पुस्तक बाजारात येण्यापूर्वीच चर्चेत आले आहे. त्यातील दावे, गौप्यस्फोट यावरून राजकारण तापले आहे. तर मंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा संजय राऊतांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

बोलायला लावू नका, नाही तर... संजय शिरसाट यांनी एका वाक्यात विषय संपवला; राऊतांवर हल्लाबोल
संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोलImage Credit source: गुगल
| Updated on: May 16, 2025 | 12:13 PM
Share

नरकातील स्वर्ग हे संजय राऊतांचे पुस्तक येण्यापूर्वीच चर्चेत आले आहे. या पुस्तकातील दावे आण गौप्यस्फोटांनी राजकारण तापले आहे. या पुस्तकातील दाव्यांवर आता सत्ताधारी गोटातून तुफान हल्लाबोल करण्यात आला आहे. भाजप, शिंदे गटातील अनेक नेते, मंत्र्यांनी राऊतांच्या दाव्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मंत्री संजय शिरसाट यांचे पुस्तक हे केवळ प्रसिद्धा स्टंट असल्याची टीका केली आहे. काय म्हणाले शिरसाट?

ही तर पिक्चरची स्टोरी

मी काही तरी स्फोटात्मक बोलतो आणि लिहिलो, ते सत्य माना, हे प्रकार प्रसिद्धीसाठी आहेत. नौटंकी आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर केली. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना, मग ते चित्रपट क्षेत्रातील कलाकार असो, व्यापारी, बिल्डर असो कोणी असो, राजकारणातील कोणी असेल त्याला मदत केली आणि वाच्यता केली नाही. म्हणून अनेक लोक शिवसेनाप्रमुखांवर प्रेम करतात. यांच्यामुळे शिवसेनाप्रमुख मोठे झाले नाही. त्यांच्या सावलीत हे लोकं वाढले आहेत. आमच्यासारखे लोकं मोठे झाले ते त्यांच्या आशीर्वादामुळे असे सांगत, शिरसाट यांनी राऊतांनी जे काही पुस्तक लिहिलंय ते पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखं केली आहे. स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा हा प्रकार आहे, असा घणाघात केला.

राजकारणात सर्वच गोष्टी सांगून होत नाही

राजकारणात अशा गोष्टा सांगून केल्या जात नाहीत. शिवसेना वाढायला मुंबईत कारणीभूत कोण होते. हे कधी कुणी सांगितलं नाही. शरद पवार कुणाशी बोलले. पवारांनी विरोध का केला. नरेंद्र मोदींनी कुणाला वाचवलं. या गोष्टी शरद पवार यांनी बोलल्या तर त्याला महत्त्व आहे. ज्यांनी मदत केली. ते बोलले तर त्याला आगळंवेगळं महत्त्व आहे ना. तुम्ही ही दलाली कशाला करता. तुम्हाला कुणी सांगितलं हे सर्व. तुम्ही त्यांचं ऐकून हे करत असाल तर त्यांच्या तोंडून येऊ द्या ना, असे संजय शिरसाट म्हणाले.

खऱ्या अर्थाने जे शिवसैनिक आहेत, त्यांच्या हातात शिवसेना आली आहे. लोकांनी दिलेला प्रतिसाद आणि मते ही दिसून आली. तुम्ही सहानभूतीच्या आधारावर राजकारण केलं ते लोकांनी नाकारलं. बोलायला लावू नका, शिवसेनाप्रमुखांवर तुमचं किती बेगडी प्रेम होतं, त्या शेवटच्या दिवसाला आम्ही सुद्धा तिथे होतो. मी होतो. मातोश्रीच्या आत मी होतो. म्हणून आम्हाला बोलायला लावू नका. नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील. आणि त्यावेळी जे शिवसैनिक अहोरात्र शिवसेनाप्रमुखांच्या पाठी ढाली सारखे उभे होते, म्हणून त्याच शिवसेनेच्या हातात शिवसेना आली आहे, असा घणाघात त्यांनी घातला.

राऊतांसाठी राहुल गांधी मोठे

संजय राऊत काही करू शकतात. इंग्रजीत लिहील. आणि राहुल गांधी परदेशातील विद्यापीठात जातील आणि तिथे या पुस्तकाचं प्रकाशन करतील. यांना राहुल गांधी हे शिवसेना प्रमुखांपेक्षाही मोठे वाटतात. हे सत्य आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय राऊत खरं कधीच बोलणार नाही. एखाद्या दरोड्यासारखा आहे. पुढे कसा दरोडा टाकायचा ही दरोडेखोराची मानसिकता असते, तीच राऊतांची मानसिकता आहे. ही स्क्रिप्ट आहे. मनाने घडवलेली स्क्रिप्ट आहे. अमित शाह यांना शिवसेनाप्रमुखांनी मदत केली नाही हे नाकारत नाही. मदत केली आहे. पण संजय राऊत यांनी स्क्रिप्ट लिहिलीय, अशी टीका शिरसाट यांनी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...