AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केले तर…’, संभाजीराजे छत्रपती यांची मोठी घोषणा

Santosh Deshmukh murde case Beed protest: मी संतोष देशमुख यांच्या घरच्या लोकांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा एकच निर्णय घेतला. तो निर्णय हा होता. हा या प्रकरणाचा जो महोरक्या आहे. त्याचा नेता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन सांगतो, तो नेता धनंजय मुंडे आहे.

'बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केले तर...', संभाजीराजे छत्रपती यांची मोठी घोषणा
संभाजीराजे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 28, 2024 | 3:58 PM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीला शिक्षा करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मूक मोर्चा निघाला. या मोर्चात संभाजी राजे छत्रपती यांनी सहभाग घेतला. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, असे मी म्हटले होते. आता त्यांचा राजीनामा घेतील की नाही, हकालपट्टी करतील की नाही हे मला माहीत नाही. परंतु धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नका. त्यांना बीडचे पालकमंत्री पद दिले तर बीडचे पालकत्व मी घेणार आहे, अशी घोषणा संभाजी राजे छत्रपती यांनी केला.

काय घडले महाराष्ट्रात?

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यावेळी मी महाराष्ट्रात नव्हतो. संतोष देशमुख यांना क्रूर पद्धतीने मारले गेले. संतोष देशमुख यांना ज्या क्रूरपणे मारले गेले, ते दुर्देव आहे. शिवाजी महाराजांच्या घरात जन्म होऊनही मला ते पाहावले नाही. शाहू, फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात हे काय झाले? असा प्रश्न मला पडला.

…तर मी पालकत्व घेणार

संभाजीराजे म्हणाले, मी संतोष देशमुख यांच्या घरच्या लोकांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा एकच निर्णय घेतला. तो निर्णय हा होता. हा या प्रकरणाचा जो महोरक्या आहे. त्याचा नेता धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन सांगतो, तो नेता धनंजय मुंडे आहे. या लोकांना आश्रय देणाऱ्यांना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका, असे मी त्यावेळी सांगितले होते. परंतु त्यांना मंत्रिपद दिले. आता त्यांचा राजीनामा घेतील की नाही, हकालपट्टी करतील की नाही हे मला माहीत नाही. परंतु धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नका. त्यांना बीडचे पालकमंत्री पद दिले तर बीडचे पालकत्व मी घेणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले.

संभाजीराजे पुढे म्हणाले, आम्हाला दहशत चालत नाही. कुणी दहशत करत असेल तर मी या ठिकाणी येणार आहे. काय चालले या बीडमध्ये? बीडचा बिहार करायचा का? त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. हा महाराष्ट्र आपला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान