AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीराजेंनी मारला मिसळीवर ताव… दौऱ्यात कष्ट केलेल्या कार्यकर्त्यांना आग्रहाने वाढली मिसळ

स्वराज्य संघटनेचे काम आणि इतर सर्व तणाव विसरून संभाजीराजे यांनी मिसळबद्दल आणि एकूणच कामाच्या व्यतिरिक्त चर्चा करत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या.

संभाजीराजेंनी मारला मिसळीवर ताव... दौऱ्यात कष्ट केलेल्या कार्यकर्त्यांना आग्रहाने वाढली मिसळ
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 02, 2022 | 2:09 PM
Share

नाशिक : स्वराज्य संघटनेच्या विस्तारासाठी राज्यभर संभाजीराजे छत्रपती दौरा करत आहे. गेले तीन दिवस संभाजीराजे छत्रपती हे नाशिकच्या विविध भागात शाखा उद्घाटन करत सभा घेत होते. याच काळात कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतल्याने संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन मिसळ खाण्याचा बेत आखला होता. नाशिकचे प्रसिद्ध मिसळीच्या हॉटेलात जाऊन राजे यांच्यासह त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिसळीवर ताव मारला. नाशिकची मिसळ सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यातच संभाजीराजे हे स्वतः खवय्ये आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना स्वतः संभाजीराजे मिसळ खायला येणार असल्याने मोठा आनंद झाला होता. त्यातच संभाजीराजे यांनाही नाशिकची मिसळ प्रचंड आवडली असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना आग्रह करत मिसळ स्वतः वाढली. विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी मिसळ स्वतः वाढायला घेतल्याने कार्यकर्त्यांना हा क्षण सुखावणारा होता. संभाजीराजे यांचा हा साधेपणा पाहून हॉटेल मालकांना देखील मोठा आनंद झाला होता.

नाशिकच्या गंगापूर परिसरात असलेल्या साधना मिसळ या हॉटेलात संभाजीराजे छत्रपती आल्याने हॉटेलच्या संचालकांना मोठा आनंद झाला होता.

संभाजीराजे छत्रपती आणि प्रवक्ते धनंजय जाधव, करण गायकर यांच्यासह राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिसळ खाण्यासाठी पोहचले होते.

स्वराज्य संघटनेचे काम आणि इतर सर्व बाबी विसरून संभाजीराजे यांनी मिसळबद्दल आणि एकूणच कामाच्या व्यतिरिक्त चर्चा करत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या.

संभाजीराजे यांचा साधेपणा यावेळी पुन्हा एकदा बघायला मिळाला, दोन दिवसापूर्वी नाशिकच्या सर्किट हाऊस येथील किचनमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी नाष्टा बनविला होता.

सर्किट हाऊस मध्ये जाऊन नाष्टा बनविणे, स्वतःसह कार्यकर्त्यांनाही देणे, दौऱ्यावर कार्यकर्त्यांमध्ये खाली बसून जेवण करणे, मिसळ खायला जाऊन तिथेही कार्यकर्त्यांना मिसळ वाढणे या साधेपणाच्या बाबी चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक