पूरग्रस्त भागात खांद्याला खांदा लावून काम, आर्मीच्या जवानांचा संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांना सॅल्युट

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनीही पूरग्रस्त भागात मोठं काम केलं आहे. खुद्द आर्मीच्या जवानांनीच त्यांचं कौतुक केलं आहे.

पूरग्रस्त भागात खांद्याला खांदा लावून काम, आर्मीच्या जवानांचा संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांना सॅल्युट
Follow us
| Updated on: Aug 13, 2019 | 12:01 PM

Sambhaji Bhide सांगली :  पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात सरकारी पातळीवर मदतकार्य सुरु आहे. आर्मी, नेव्ही, एनडीआरएफ, एसडीआरआफसह स्थानिक संघटना, विविध संस्था स्वत:हून मदत करत आहेत. आर्मीच्या जवानांना मदतकार्यात स्थानिकांची मोठी साथ लाभत आहे. संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या (Shiv Pratishthan Hindustan) धारकऱ्यांनीही पूरग्रस्त भागात मोठं काम केलं आहे. खुद्द आर्मीच्या जवानांनीच त्यांचं कौतुक केलं आहे.

शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आर्मीच्या जवानांना प्रचंड मदत केल्याची भावना जवानांनी व्यक्त केली. जवानांच्या जेवणा-खाण्याची सोय असो, त्यांच्या बचावकार्यात मदत असो या धारकऱ्यांनी जवानांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. महत्त्वाचं म्हणजे पुरामुळे सर्व वाटा नष्ट झाल्यामुळे जवानांना मदत पोहोचवणं अवघड झालं होतं. अशा परिस्थितीत जवानांना मार्ग दाखवणे, त्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवप्रतिष्ठानने केल्याचं जवानांनी सांगितलं.

धारकऱ्यांनी केलेल्या सहकार्याचं कौतुक करताना एका जवानाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

“नेमकी परिस्थिती काय आहे याबाबतचा अंदाज नव्हता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना सलाम आहे. त्यांनी आम्हाला खूप म्हणजे खूप साथ दिली. सचिन मोहित या कार्यकर्त्याने तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमची साथ सोडली नाही. खाण्यापासून, नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्व सोय केली. आमच्यासोबत बरेच कार्यकर्ते होते, सर्वांची नावं माहित नाही. त्यांनी मदत केली. आमच्या इतकंच त्यांनीही काम केलं. अशीच जर एकता राहिली तर आपण कुठेही फतेह करु शकतो, कुठेही विजय मिळवू शकतो” अशी प्रतिक्रिया जवानाने दिली.

जितेंद्र आव्हाड यांचं टीकास्त्र

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांच्यावर टीका केली होती.

कोण आहेत संभाजी भिडे?

भिडे गुरुजी किंवा संभाजी भिडे या नावाने प्रसिद्ध असले तरी त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे असल्याची माहिती आहे. संभाजी भिडे 85 वर्षांचे असून ते सांगलीत राहतात. त्यांचं मूळ गाव साताऱ्यातील सबनीसवाडी आहे.

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप होता.

न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एमए केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते, असं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतं. संभाजी भिडे पायात चप्पल घालत नाहीत. ते अनवाणी चालतात. प्रवास करताना सायकल किंवा एसटीने प्रवास करतात, असं म्हटलं जातं.

संभाजी भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते, मात्र त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नावाची संघटना उभी केली. 1984 साली ही संघटना स्थापन झाल्याचं श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या वेबसाईटवर म्हटलंय.

श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान म्हणजे प्रतिसंघ होता, संघाच्या उपक्रमांना पर्यायी उपक्रम त्यांनी सुरु केले, असं सांगितलं जातं. श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान संघटनेतील प्रत्येकाला धारकरी असं म्हणतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः “भिडे गुरुजी मला आदेश सोडतात.” असं सांगितलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संभाजी भिडे यांची चांगलीच जवळीक आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.