Sangli | श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे कावड यात्रेचे आयोजन, शेकडो वर्षांची परंपरा सुरू…

| Updated on: Aug 16, 2022 | 11:31 AM

सांगलीतील शिवतिर्थावर श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते नदीच्या पाण्याचे पुजन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या समोर या कावडचे पूजन करून त्याच पाण्याने श्री क्षेत्र संगमेश्वर, हरिपूर येथे मंदिरात संगमेश्वरास अभिषेक करण्यात आला.

Sangli | श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे कावड यात्रेचे आयोजन, शेकडो वर्षांची परंपरा सुरू...
Follow us on

सांगली : श्रावण सोमवारनिमित्त सांगलीत (Sangli) शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तर्फे भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते सात गड आणि अकरा नद्यांचे पाण्याची (Water of rivers) आणि कावडची पूजा करण्यात आली. यावेळी श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच शिवतांडव स्तोत्र पठन झाले. त्यानंतर या कावड यात्रेस सुरवात झाली. नद्यांच्या पाण्याने श्री क्षेत्र संगमेश्वर येथे मंदिरात संगमेश्वरास अभिषेक करण्यात आला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी (Crowd) बघायला मिळाली.

पवित्र नद्यांच्या पाण्याने भगवान महादेवांना अभिषेक

पवित्र अशा श्रावण महिन्यात पवित्र नद्यांच्या पाण्याने भगवान महादेवांना अभिषेक करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत सांगलीमध्ये हि परंपरा सुरू करण्यात आली. कृष्णा नदीचे पाणी, शिवनेरी, राजगड, रायगड, सिंधू, दुर्ग, विजय दुर्ग, अजिंक्यतारा, प्रतापगड अशा 7 गडांचे आणि गंगा, नर्मदा, भिमा, निरा, कृष्णा, कोयना, सावित्री अशा 11 नद्यांचे पाणी यासाठी खास आणण्यात आले.

हे सुद्धा वाचा

कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते नदीच्या पाण्याचे पुजन

सांगलीतील शिवतिर्थावर श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते नदीच्या पाण्याचे पुजन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या समोर या कावडचे पूजन करून त्याच पाण्याने श्री क्षेत्र संगमेश्वर, हरिपूर येथे मंदिरात संगमेश्वरास अभिषेक करण्यात आला. श्री परमपूज्य कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी हा सर्व विधी केलायं. विशेष म्हणजे अशाप्रकारे अभिषेक करण्याची ही शेकडो वर्षांची परंपरा इथे सुरू आहे.