35 वर्षीय कोरोना बाधित महिलेची आत्महत्या, हॉस्पिटलच्या बाथरुममध्येच गळफास

कोरोना संसर्गानंतर महिलेला सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावरील उपचारानंतर ती बरीही झाली होती. (Sangli Miraj Lady Suicide COVID Hospital)

35 वर्षीय कोरोना बाधित महिलेची आत्महत्या, हॉस्पिटलच्या बाथरुममध्येच गळफास

सांगली : हॉस्पिटलमध्येच कोरोना बाधित महिला रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय कोव्हिड हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. बाथरुममध्ये गळफास घेऊन 35 वर्षीय महिलेने आयुष्य संपवलं. रुग्णालयात झालेल्या या आत्महत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Sangli Miraj Lady Commits Suicide in COVID Hospital Bathroom)

कोरोना उपचारानंतर सुधारणा

सुमन कुंभार असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. ती मिरजमधील सुभाषनगर भागातील रहिवासी होती. कोरोना संसर्ग झाल्यानंतर तिला सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावरील उपचारानंतर महिला बरीही झाली होती.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

दरम्यान, महिलेची ऑक्सिजन पातळीही चांगली झाली होती. मात्र अचानक तिने बाथरुममध्ये जात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिरज कोव्हिड रुग्णालयात गेल्या वर्षीही रुग्णाची आत्महत्या

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच गेल्या वर्षी एका कोरोनाबाधिताने गळा कापून घेऊन आत्महत्या केली होती. मिरज-मालगाव रस्त्यावरील अमननगर येथे राहणार्‍या हुसेन बाबुमिया मोमीन (वय 55) यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मिरज कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोमीन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला. परंतु मध्यरात्री त्यांनी चाकूने गळा कापून आत्महत्या केली होती.

डिस्चार्जची तयारी सुरु असताना रुग्णाची आत्महत्या

कोव्हिड रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बीड शहरातील एका खासगी कोव्हिड रुग्णालयात काही दिवसांपूर्वी घडला होता. रामलिंग सानप (Ramling Sanap) असं आत्महत्या केलेल्या रुग्णाचं नाव होतं. डिस्चार्ज देण्याची तयारी सुरु असतानाच सानप यांनी आत्महत्या केली होती.

संबंधित बातम्या-

गळफास नव्हे, गळा कापून आत्महत्या, मिरजेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचं थरारक कृत्य

ठाण्यात 72 वर्षीय कोरोना रुग्णाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

(Sangli Miraj Lady Commits Suicide in COVID Hospital Bathroom)