ठाण्यात 72 वर्षीय कोरोना रुग्णाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

ठाण्यात 72 वर्षीय कोरोना रुग्णाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

ठाणे महापालिकेच्या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत 72 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केली.

Nupur Chilkulwar

|

Sep 06, 2020 | 9:40 PM

ठाणे : ठाणे महापालिकेच्या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत 72 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केली (Old Corona Patient Commit Suicide). ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल असलेल्या 72 वर्षीय वृद्धाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली आहे (Old Corona Patient Commit Suicide).

आज दुपारी ही घटना घडली. भिकाजी वाघुले असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चार दिवसांपूर्वी त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार देखील सुरु होते. मात्र, आज दुपारी अचानक वाघुले यांनी खाली उडी घेत आत्महत्या केली.

वाघुले यांनी आत्महत्या केली, तेव्हा आयसीयुमध्ये कोणी उपस्थित नव्हते का? सुरक्षा रक्षक कुठे गेले होते असे अनेक प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेचे हे रुग्णालय अनेक कारणांनी आधीच वादग्रस्त ठरले आहे. आता या प्रकारानंतर रुग्णालयाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

दरम्यान, घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. मात्र, ठाणे महापालिकेकडून अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. तर याप्रकरणी प्रशासनाची चूक असेल तर याबाबत कारवाई झाली पाहिजे आणि या सर्व प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, असे शिवसेना नगरसेवक संजय भोईर यांनी सांगितले आहे.

Old Corona Patient Commit Suicide

संबंधित बातम्या :

उसने दिलेले पैसे परत न केल्याने मुंबईतील व्यापाराचे अपहरण, पुण्यातून चौघांना अटक

रुग्णवाहिकेतच चालकाकडून बलात्कार, केरळमधील कोरोनाबाधित महिलेच्या आरोपांनी खळबळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें