गळफास नव्हे, गळा कापून आत्महत्या, मिरजेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचं थरारक कृत्य

मिरज कोविड रुग्णालयात हुसेन मोमीन या कोरोना रुग्णाने गळा कापून घेत आत्महत्या केलीय. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालीय. नातेवाईकांनी मात्र आत्महत्येविषयी संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केलीय. (corona positve patient suicide)

गळफास नव्हे, गळा कापून आत्महत्या, मिरजेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचं थरारक कृत्य

सांगली- जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) मध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधिताने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.(Corona Positive patient suicide in Miraj Civil Hospital)

मिरज-मालगाव रस्त्यावरील अमननगर येथे राहणार्‍या हुसेन बाबुमिया मोमीन (वय ५५) यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दहा दिवसांपूर्वी मिरज कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोमीन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला. परंतु, मध्यरात्री त्यांनी चाकूने गळा कापून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्येबाबत, मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मोमीन यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मोमीन यांच्या मृतदेहाचे आज दुपारी मिरज कोविड रुग्णालयात शवविच्छेन करण्यात आले.

नातेवाईकांना आत्महत्येविषयी संशय

हुसेन मोमीन यांचा मुलगा मस्तफा मोमीन आणि नातेवईकांनी आत्महत्येविषयी संशय व्यक्त केला आहे. वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना मिरजच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मध्यरात्री 3 वाजता वडिलांनी आत्महत्या केल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. माझे वडिल आत्महत्या करतील असे वाटत नाही. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुस्तफा मोमीन याने केलीय. मोमीन यांच्या नातेवाईकांनी देखील आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी त्यांनी केलीय.

संबंधित बातम्या-

ठाण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

Balya Binekar | नागपुरात गँगस्टर बाल्या बिनेकरच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी, छतांवरही बघे, दोन हजार जण जमल्याची चर्चा

(Corona Positive patient suicide in Miraj Civil Hospital)