AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

70 हजारांचा बैल गावात आणला अन् थरार घडला, एक बैल,4 मगरी, किस्सा चर्चेत

गावातल्या पोरांनी पकडायचा प्रयत्न केला तर हे बैलोबा थेट नदीपात्रातच पडले. किस्सा इथेच संपत नाही, इथून पुढेच थरार सुरु झाला.

70 हजारांचा बैल गावात आणला अन् थरार घडला, एक बैल,4 मगरी, किस्सा चर्चेत
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 14, 2023 | 12:31 PM
Share

शंकर देवकुळे,सांगली : सांगलीतल्या (Sangli) भिलवडी गावात एका बैलानं नुकतीच एंट्री मारली अन् मोठा विचित्र किस्सा घडला. चांगला देशी वाणाचा बैल तब्बल ७० हजारात खरेदी केला म्हणून शेतकरी कुटुंब खुशीत होतं. मोठ्या उत्साहानं गावात आणलं. गाडीतून उतरत असताना हे जनावर थोडं सैरभैर झालं. नवं गाव पाहून गोंधळलेलं होतं. त्यातच एका ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून पार घाबरलं अन् सैरावैरा पळायला लागलं. थेट नदीकाठ गाठला. गावातल्या पोरांनी पकडायचा प्रयत्न केला तर हे बैलोबा थेट नदीपात्रातच पडले. किस्सा इथेच संपत नाही, इथून पुढेच थरार सुरु झाला. नदीतल्या 4 मगरींच्या जाळ्यात बैल सापडला..

काय घडलं नेमकं?

भिलवडीतील साठेनगरमधील अक्षय मोरे यांचा हा बैल. आटपाडी येथील बाजारातून तब्बल 70 हजार रुपयांत त्यांनी हा देशी बैल खरेदी केला. गावात मोठ्या उत्साहानं बैलाला आणलं गेलं. टेम्पोतून त्याला गावात आणलं. मात्र गाडीतून खाली उतरत असताना ट्रॅक्टरचा हॉर्न ऐकून तो गोंधळला. अन् थेट पळत सुटला. तो नदी काठाला पळाला. यावेळी युवकांनी त्याला पकडण्यासाठी दोरीचा फास केला. मात्र तो फास चुकवून बैल हा नदीपात्रात पडला. बैल हा दुष्काळी भागातील असल्याने नदीचे पाणी पाहून तो सैरभैर झाला. नवीन नदीत गोंधळून गेला. अखेर पोहत पोहत तो पैलतीरावर अंकलखोपच्या दिशेने चालला. याच दरम्यान नदीपात्रात तीन-चार मगरींनी त्याचा पाठलाग सुरू केला. बैल मगरींना चकवा देत होता अन् काठाच्या दिशेने पोहत निघाला. अखेर एक पैलतीर गाठलं, पण त्याच्या भोवती मगरी फिरतच होत्या. नव्या बैलाला असं मगरींनी घेरलेलं पाहून गावकरी प्रचंड घाबरले. अखेर इथल्या युवकांनी मदतीसाठी स्थानिक नावाडी नितीन गुरव यांना बोलावलं. नितीन गुरव तात्काळ घटनास्थळी आले. काही तरुणांना त्यांनी सोबत घेतलं. एक तराफा घेतला आणि मगरींच्या जाळ्यातून बैलाची सुखरुप सुटका केली. तब्बल चार तास चाललेला हा थरार कृष्णा काठच्या गावकऱ्यांनी डोळ्यात प्राण आणून अनुभवला.

भिलवडीत घडलेला हा थरारक किस्सा सध्या सांगलीत तुफान चर्चेत आहे. स्थानिक नावाडी नितीन गुरव यांनी तत्काळ मदत केली, त्यामुळे बैलाचा जीव वाचला. शेतकरी अक्षय मोरे यांनी गुरव यांचे आभार मानले.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार