तुमची पोरगी माझ्या नवऱ्याला सारखी सारखी फोन का करते? जाब विचारला अन्… बॅटने मारहाण; असं काय घडलं?

सांगलीमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एका महिलेने दुसऱ्या पुरुषाला आणि त्याच्या मुलीला चांगलीच मारहाण केली आहे. आता हे प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया...

तुमची पोरगी माझ्या नवऱ्याला सारखी सारखी फोन का करते? जाब विचारला अन्... बॅटने मारहाण; असं काय घडलं?
Sangali Crime
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 02, 2026 | 3:41 PM

महाराष्ट्रातील सांगली शहरात कौटुंबिक वादातून एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या मुलीला लाकडी बॅटने बेदम मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून, यात जखमी झालेले वृद्ध किसन चिलाप्पा भोसले (वय ८०, रा. रमामातानगर, सांगली) यांच्यासह त्यांची मुलगी सारिका यांनाही मार लागला आहे. या प्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन संशयितांवर कारवाई सुरू आहे.

नेमके काय घडले?

सांगलीतील लक्ष्मी मंदिराजवळ राहणाऱ्या विशाखा राहुल ढमाळ हिचा बुधवारी सकाळी किसन भोसले यांच्यासोबत जोरदार वाद झाला. विशाखा हिने किसन यांना थेट प्रश्न विचारला, “तुमची मुलगी सारिका माझ्या पतीला फोन का करते?” हा वाद संपल्यानंतर काही वेळातच विशाखा आणि तिच्यासोबत रुद्र राहुल ढमाळ व श्रद्धा राहुल ढमाळ हे तिघे किसन यांच्या घराबाहेर येऊन दंगा करु लागले. त्यावेळी किसन भोसले, त्यांची मुलगी सारिका आणि नातेवाईक रुद्र हे घराबाहेर आले आले. त्यानंतर संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत लाकडी बॅटने मारहाण सुरू केली.

वाद आणखी चिघळल्याने भांडण मिटवण्यासाठी आलेल्या किसन आणि रुद्र यांनाही संशयितांनी लक्ष्य केले. या मारहाणीत किसन भोसले आणि सारिका गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते.

गुन्हा दाखल आणि पोलिस तपास

या घटनेनंतर सांगली पोलीस ठाण्यात विशाखा राहुल ढमाळ, रुद्र राहुल ढमाळ आणि श्रद्धा राहुल ढमाळ (सर्व रा. लक्ष्मी मंदिराजवळ, सांगली) यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून, संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. तपासादरम्यान वादाचे नेमके कारण आणि पार्श्वभूमी उघडकीस येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अशा कौटुंबिक वादांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण होत असते. सांगलीसारख्या शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शहरात अशी घटना घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीसांनी आवाहन केले आहे की, असे वाद असल्यास संयम ठेवून कायदेशीर मार्गाने सोडवावेत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणाची चौकशी सांगली पोलीस करत आहेत.