शिवसेना फूटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिकला येणार, उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा कधी होणार?
बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत माजी मंत्री बबन घोलप, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगूजर, उपनेते सुनील बागूल, वसंत गीते बैठकीला उपस्थित होते.

नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सभा घेणार आहे. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना जाहीर सभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहे. नाशिकच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले होते. ठाकरे गटातील नगरसेवक तसेच संपर्कप्रमुख शिंदे गटात गेल्याने पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे लवकरच नाशिक दौरा करणार आहे, त्याची तयारी करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहे. या दरम्यान जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेची तयारी करा असे आदेश दिले आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. बुधवारी उशिरा झालेल्या बैठकीत आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चाही करण्यात आली आहे. यामध्ये पक्षफूटीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून यामध्ये संपर्कप्रमुख पदी लवकरच निवड करण्याची मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
ठाकरे यांचं नेहमीच मुंबईनंतर नाशिकवर लक्ष राहिलं आहे. नाशिक आपल्याच ताब्यात राहावं यासाठी सर्वच ठाकरे यांचे नाशिक दौरे होत असतात, यापूर्वी देखील झाले आहे.
बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत माजी मंत्री बबन घोलप, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगूजर, उपनेते सुनील बागूल, वसंत गीते बैठकीला उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाची ताकत वाढविण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा नाशिकमध्ये मेळावा होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येणार आहे.
नाशकात शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहील यासाठी उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकार्यांना शब्द दिल्याची माहिती आहे.
याशिवाय नाशिकच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर देणार याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये वसंत गीते यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे.
