AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रभक्तीचं ढोंग, PM मोदी, अमित शहा सभागृहात नसताना…; संजय राऊत संतापले, सत्ताधाऱ्यांवर पेटले

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. वंदे मातरम विधेयकावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा सभागृहात नव्हते, अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रभक्तीचं ढोंग, PM मोदी, अमित शहा सभागृहात नसताना...; संजय राऊत संतापले, सत्ताधाऱ्यांवर पेटले
| Updated on: Jul 31, 2026 | 2:52 PM
Share

लोकसभा आणि राज्यसभेत काल ‘वंदे मातरम’ मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता संबंधित कायदा अस्तित्वात येण्याचा मार्ग सुकर झालाय. वंदे मातरम विधेयकाला मंजुरी मिळत असताना सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अनुपस्थिती होती, असा विरोधकांनी आरोप केला आहे. सरकारच्या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या गैरहजेरीवरून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, पेपरफुटीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. आम्ही आमची मत तिथे मांडली. मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण झालं, त्यांनतर आम्ही बोललो. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात बोलत नाहीत. ज्या खात्याचा मंत्री ज्याचा संबध नाही, तो यावर बोलतो. वंदे मातरम विधेयक चर्चेला आलं, तेव्हा पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नसतात. अमित शहा उद्या टिळक पुरस्कार द्यायला जात आहेत. अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार देणाऱ्यांच मला कौतुक वाटतं. पुणेकर यांनी याला विरोध करण्याच निर्णय घेतला आहे’.

‘टिळक यांचे वंशज शिंदे गटात आहेत, ते म्हणत आहेत की तर राजकारण आणू नका. अमित शहा कोण आहेत? बाबा आमटे आहेत का? पुणेकर जनता हे मान्य करणार नाही. विधेयकावर चर्चा झाली. सर्व विरोधकांनी आपली मते मांडली. मुलांना मारताना पॅलेट गन वापरली. विद्यार्थी आणि परिक्षांवर बोलण्यासाठी पंतप्रधान गृहमंत्री उपस्थीत नव्हते. वंदे मारतम विधेयकासाठी पूर्ण अधिवेशन घेतले, ते विधेयक चर्चेला आले असताना पंतप्रधान आणी गृहमंत्री शहा सदनात नसतात. केंद्रीय गृहमंत्री उद्या पुण्यात चालले आहेत. लोकमान्य टिळकांसारख्या व्यक्तीचा पुरस्कार अशा माणसाच्या हाताने दिल्याचा घाट घातला जातोय. टिळकांच्या नावाचा बाजार पुणेकर मान्य करणार नाही. जंतरमंतरवर मुलांना मारण्याचा ज्यांनी आदेश दिला, त्यांच्या हाताने हा पुरस्कार दिला जातोय, अशी टीका राऊतांनी केली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही राऊतांनी टीका केली. ‘त्यांनी ते संशोधन केले आहे. त्यांच्या शोधाबद्दल फडणवीसांनी त्यांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली पाहिजे.  त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु केले पाहिजे. त्यांना जर हा पुरस्कार दिला नाही, तर देश एका मोठ्या संशोधकाला मुकेल. दादा यांचा दगडाशी जवळचा संबध आहे’, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली. ‘टिळक पुरस्कार हा अजित डोवाल यांना दिला जातोय. हे कसले देशभक्त. आम्ही टिळक भक्त आहोत. त्यामुळं त्यावर आम्ही बोलणार आणि लिहीत राहणार. पुणेकर याला विरोध करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा