उद्धव ठाकरे यांची सभा विराट करण्यासाठी संजय राऊत मैदानात, सभेआधीच गद्दर म्हणत राऊतांनी कुणाला डिवचलं?

मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा 26 मार्चला होणार आहे. त्यासाठी संजय राऊत हे मैदानात उतरले असून सभेपूर्वी विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत.

उद्धव ठाकरे यांची सभा विराट करण्यासाठी संजय राऊत मैदानात, सभेआधीच गद्दर म्हणत राऊतांनी कुणाला डिवचलं?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 2:57 PM

नाशिक : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्याचा दौरा करणार आहेत. काही विभागांमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. नुकतीच कोकणातील खेड येथील सभा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची दुसरी सभा ही उत्तर महाराष्ट्रात होणार आहे. त्यासाठी मालेगाव हे शहर निवडण्यात आले आहे. त्या सभेची पूर्ण तयारी नुकतेच प्रवेश केलेले अद्वय हिरे हे करीत आहे. मालेगाव येथे होत असलेल्या या जाहीर सभेसाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना येण्याचे आवाहन केले जात आहे. संजय राऊत यांच्यासह विविध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आवाहन करीत आहेत. मालेगावमधील मसगा कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले असून तयारीचा आढावा घेत आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रत काही ठिकाणी सभा घेण्याचे ठरवलं होते, त्यानुसार मालेगावला सभा होत आहे. अद्वय हिरे यांची उद्धव ठाकरेंकडून नियुक्ती केली असून, त्यांचे जोरदार काम सुरू आहे. हिरे कुटुंबाचे मालेगाव ला फार मोठं वर्चस्व आहे, त्यांच मोठं काम आहे.

महाविकास आघाडीच्या सभा देखील घेण्यात येणार आहे, लवकरच तारखा जाहीर करू. पण मालेगावच्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. मालेगावला प्रशांत हिरेंसाठी शिवसेना प्रमुख आले होते आता, अद्वय हिरेंसाठी उद्धव ठाकरे येत आहे हे मालेगावचे वैशिष्ट्य आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेना, अद्वय हिरेंची आणि आमच्या सगळ्यांची इच्छा होती मालेगावला सभा घ्यावी. मुस्लिम समाजाने फक्त मोदी किंवा भाजपलाच पाठिंबा द्यावा का? ते ह्या देशाचे नागरिक नाही का? महाराष्ट्रात आणि देशात शिवसेनेला मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा आहे.

निवडणूक आल्यावर या देशात जे धार्मिक वातावरण निर्माण केले जाते ते उधळून लावण्याचे काम शिवसेना करतेय, महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रत कधी नव्हे एवढं आराज्यक निर्माण झाले आहे.

बिचारे आदिवासी बांधवाना अन्न नाही, पाणी नाही, तरी पायी चालत आहे. कायदा सुव्यवस्थचा बोजवारा उडाला आहे, सरकार आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तेसाठी सत्तांतर करण्यात आले आहे.

मालेगाव येथे 26 तारखेला सभा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी ही सभा होणार असून त्यासाठी सर्वांनी येण्याचे आवाहन करत शिवसेनेचा मालेगाव बालेकिल्ला आहे. तो काही गद्दारांचा नाही असेही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.