अजित पवार यांच्या निधनाबद्दल खळबळजनक दावा, थेट दिल्लीहून ती फाईल…

अजित पवार यांच्या निधनानंतर मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. यादरम्यानच आता संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला असून नक्की काय सुरू होते हे त्यांनी सांगितले आहे.

अजित पवार यांच्या निधनाबद्दल खळबळजनक दावा, थेट दिल्लीहून ती फाईल...
Ajit Pawar plane accident
| Updated on: Feb 17, 2026 | 10:40 AM

संजय राऊत यांनी नुकताच अजित पवार यांच्या निधनाबद्दल मोठे विधान केले. अजित पवार यांचा अपघात नक्कीच संशयास्पद असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. दादांची फाईल बंद करण्यास अमित शहा यांनी नकार दिला होता. अजित पवार यांच्या विरोधात भाजप असे सुरू होते. यासोबतच त्यांनी म्हटले की, यानंतर अनेक संशयास्पद गोष्टी घडल्या. रोहित पवार हे फक्त राजकीय नेते नसून त्यांच्या कुटुंबातील महत्वाचे सदस्य आहेत. त्यांच्या कुटुंबाला संशय असेल आणि त्यांच्या कुटुंबाला जर सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास केला तर याला तुम्ही सकात्मक बघितले पाहिजे. इतक्या मोठ्या नेत्याचा मृत्यू होतो आणि संशयास्पद होतो, त्यामध्येच कुटुंबाचा सरकारी यंत्रणांवर विश्वास नाही. यासोबतच संजय राऊत यांनी खळबळजनक खुलासा केला.

संजय राऊत यांनी म्हटले की, माझ्या माहितीनुसार, त्यांच्या काही फाईल्स होत्या आणि त्याकरिता ते भाजपात गेले. ती फाईल पुन्हा उघडण्यात आली, अजित पवार यांच्या मृत्यू पूर्वी. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जाचा विषय होता. ती फाईल इथून खास अमित शहा यांच्याकडे गेली, बंद करण्यासाठी.

पण अमित शहा यांनी ही फाईल बंद करू नये, असा निगेटीव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर भाजपाचे मंत्री बोलायले लागले तुमची फाईल बंद झालेली नाही. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री बोलायले लागले दादा तुमची फाईल आमच्याकडे आहे आणि तिथून ही सुरूवात झाली. ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपासोबत गेले, ते कारण संपलेच नाही.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, मग दादांनी पुन्हा मागे फिरण्याबाबत पुर्वविचार सुरू केला. तिथूनच या रहस्यमय घडामोडींना सुरूवात झाली. अमित शहा यांनी ती फाईल बंद करण्यास नकार दिला. आपण त्या फाईलवरील शेरे देखील पाहू शकता. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जामध्ये घोटाळा झाला होता म्हणून साखर कारखान्याची संपत्ती जप्त करण्यात आली होती. पण ती फाईल अचानक उघडण्यात आली. केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती फाईल बंद करू नये, अशाप्रकारचे शेरा मारून ती फाईल पाठवली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us