भोंदूबाबा खरात प्रकरणात राज्यातील बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा, थेट म्हटले, अजून..

संजय राऊत यांनी सातारा प्रकरणावरून जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील गुंडशाही होऊच शकत नाही. यासोबतच त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांवरही जोरदार टीका केली.

भोंदूबाबा खरात प्रकरणात राज्यातील बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा, थेट म्हटले, अजून..
Bhondubaba Kharat
| Updated on: Mar 24, 2026 | 10:23 AM

संजय राऊत यांनी साताऱ्यातील प्रकरणावरून जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी मोठे विधान करत म्हटले की, मला वाटते की, या राज्यातील सत्तेतील मित्र पक्ष आहेत, ते जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत. साताऱ्यात जे घडले ते गुंडगिरी आणि झुंडगिरी होती. चोपलं तेव्हा तुमच्यातील शिवसैनिक कुठे गेला असाही मोठा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, भाजपाच्या मंत्र्यांनी तुम्हाला रस्त्यावर चोपलं. यादरम्यानच संजय राऊत भोंदुबाबा खरात यांच्या प्रकरणावरही बोलताना दिसले. राऊतांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, खरात प्रकरणात मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावे पुढे आली पाहिजेत. भोंदू खरात प्रकरणात अजूनही बऱ्याच खऱ्या गोष्टी बाहेर येणे बाकी असल्याचे म्हणत राऊतांनी थेटपणे मोठे संकेत दिले आहेत. राऊतांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली.

संजय राऊत यांनी म्हटले की, जे लोकशाहीचा खून झाला म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खूनाने रंगले आहेत. काल विधीमंडळाच्या पायऱ्यांवर एका विशिष्ट गटाचे आमदार आणि नेते समजले होते आणि लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा खून झाला असे सांगत होते. त्यामधील काही मंत्र्यांना मी पाहिले, ज्यावेळी ते पक्ष सोडून गेले शिवसेना तेंव्हा ते वाघांचे कातडे पांघरलेले हे वाघ गर्जना करत होते.

स्वाभिमानासाठी, हिंहुत्वासाठी आम्ही कसा पक्ष सोडला आणि काल विधीमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची म्हणजे कातडे पांघरलेल्या वाघांची काल मांजरे आणि बोके झाली होती. सरकारच्या मंत्र्यांची अवस्था का? भाजपाच्या मंत्र्यांनी तुम्हाला साताऱ्याच्या रस्त्यावर चोपलंय. कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक? कुठे गेला तुमच्यातील बाळासाहेबांनी घडवलेला मर्द मावळा?

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, मार खाल्ला तुम्ही.. तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्ला तुम्ही.. आणि तुम्ही विधीमंडळाच्या पायऱ्यांवरती छापी पिटत आहात? शेवटी तुम्ही जे कर्म केले त्या कर्माचे हे फळ आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील झुंडशाह होऊच शकत नाही. पोलिसांनी ज्याप्रकारे तिकडच्या पालकमंत्र्यांना चोप दिला तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला पाय मोडला.

Follow Us