‘ओमराजे का पळून गेले…’, संजय राऊत यांचा भरसभेत खळबळजनक आरोप
दोन वेळा खासदार आणि एक वेळा आमदार होऊन तुम्ही धाराशिवचे काय केले ? दुबई केले की सिंगापूर ? असा सवाल करीत खासदार संजय राऊत यांनी यावेळी ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेऊन मोठे आरोप केले.

उद्धव ठाकरे यांच्या उबाठा पक्षाचे सहा खासदार शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी विदर्भाचा दौरा सुरु केला आहे. आज धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदार संघात झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी घणाघाती भाषण केले. संजय राऊत यांनी आपल्या भाषणात ओमराजे निंबाळकर का पळून गेले याचे कारणच भर सभेत सांगितले.
संजय राऊत यांनी धाराशिव येथे घणाघाती भाषण केले. ते म्हणाले की भाषणात हा सोंगाड्या प्रत्येक भाषणात म्हणायचा, मी 2006 साली साधा ग्रामपंचायत सदस्य नव्हतो. मला एकदा आमदार, 2 वेळा खासदार केले अशा स्थितीत उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. मात्र, आता काय केले भामट्या असा सवाल राऊत यांनी केला.
…डरपोक सोंगाड्या सोडून गेला
संजय राऊत पुढे म्हणाले की हा म्हणतो मी विकासासाठी गेलो. याने काय विकास केला. या खासदाराने मग धाराशिवचे दुबई केले सिंगापूर ? तो का गेला कारण त्याने त्याच्या वडीलांच्या नावाने पवनराजे मल्टी स्टेट ही कंपनी उभी केली. त्याच कंपनीने पाचशे कोटीचे प्लॉट अख्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले. गरीबांच्या नावाने बोगस खाती तयार केली. तेरणातील भंगार विकून पैसे खाल्ले आणि आता ईडी चौकशी लागल्याने हा डरपोक सोंगाड्या सोडून गेला असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.
वडीलांचा खून झाला या मागे देखील संशय
७ मे २०२४ मध्ये भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात समाधान पाटील याची मतदान केंद्राच्या बाहेर हत्या झाली होती. ही हत्या शिंदे गटाने केली होती. आता हा गद्दार हत्या करणाऱ्यांच्या गोटात गेला आहे. शिवसेनेसाठी बलिदान करणाऱ्या गद्दारी करताना याने समाधान पाटील यांना विचाराले होते का ? त्यांची परवानगी घेतली होती का ? याच्या वडीलांचा खून झाला या मागे देखील संशय असल्याचे म्हटले जात असल्याचाही आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.
उमरगा येथील शिवसैनिकांनी पत्र लिहून सांगितले होते की आमच्या किडन्या विकतो आणि पैसे देतो परंतू तूम्ही शिवसेनेशी गद्दारी करु नका ? तरीही हा माणूस निघून गेला. तू खासदार स्वतःच्या हिमंतीवर नाही तर शिवसैनिकांच्या जीवावर झाला असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. आम्ही २० वर्षे सापला दूध पाजले होते. आता सापाचा फणा ठेचण्याची वेळ आली आहे असाही घणाघात यावेळी संजय राऊत यांनी केला.