Sanjay Raut : आदल्यादिवशी एक विमान सूरतला जातं, दुसऱ्यादिवशी तेच विमान अजितदादांना…राऊत यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut : सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. सकाळपासून कोणी नेता त्यांना भेटायला गेला नाही. त्यांना प्रफुल्ल पटेलांच्या घरी नाष्ट्यासाठी जावं लागलं.

Sanjay Raut : आदल्यादिवशी एक विमान सूरतला जातं, दुसऱ्यादिवशी तेच विमान अजितदादांना...राऊत यांचं मोठं वक्तव्य
Sanjay Raut
| Updated on: Feb 11, 2026 | 10:53 AM

“अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची तटस्थपणे चौकशी केली पाहिजे. सीआयडी चौकशी करणार नाही. हा तांत्रिक विषय आहे, रहस्यमय, राजकीय विषय आहे. आदल्यादिवशी एक विमान गुजरात, सूरतला जातं ते दुसऱ्यादिवशी अजित पवारांना घेऊन जाण्यासाठी बारामतीत येतं आणि कोसळतं” असं संजय राऊत म्हणाले. “पूर्व विदर्भातले नेते कोण सांगायला पाहिजे. ते भाजपचे आहेत का? ते राष्ट्रवादीचे आहेत का? ते कुठल्या पक्षाचे आहेत? नाव सांगायला हरकत नाही. जर ते पूर्व विदर्भातले नेते अजित पवारांना मुद्दाम उशिरा येऊन भेटले असतील. त्यांचा मोटारीने जाण्याचा प्लान रद्द करायला लावला असेल. तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिज. तो नेता कोण? कुठल्या पक्षाचा आहे? अशी काय घाई होती? अशी कोणती फाईल होती, त्या फाईलवर सही केली नसती तर महाराष्ट्र थांबला असता का?” असं प्रश्न संजय राऊत यांनी विचारलेत.

सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. सकाळपासून कोणी नेता त्यांना भेटायला गेला नाही. त्यांना प्रफुल्ल पटेलांच्या घरी नाष्ट्यासाठी जावं लागलं. यावर संजय राऊत म्हणाले की, “याच्यावर मी काय सांगणार? त्यांचा पक्ष आहे, सत्तेतला पक्ष आहे. उपमुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्राच्या. हा पक्षांतर्गत विषय आहे. पक्षामध्ये सर्वकाही ठिकं नाही, एवढच मी म्हणू शकतो” असं संजय राऊत म्हणाले.

..तर शिवसेनेचा पाठिंबा असेल

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आला आहे, उद्धव ठाकरे शिवसेनेची भूमिका काय? “आम्ही प्रस्तावाच्या बाजूने आहोत. संसदेत ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटला जातोय. विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आवाज उठवू दिला जात नाही. ओम बिर्ला भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव असेल तर शिवसेनेचा पाठिंबा असेल” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

आपल्या देशात दबावाला कोण विचारतो

एपस्टिन फाईल्स प्रकरणात ब्रिटिश पंतप्रधानांवर दबाव आहे ते राजीनामा देऊ शकतात, या प्रश्नावर संजय राऊत यांनी “ब्रिटिश पंतप्रधान राजीनामा देणार असतील, पण आपल्या देशात दबावाला कोण विचारतो” असं म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us