AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले आमचे पेढे…

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे भाजपची मते फोडू शकतात असा खळबळजनक दावा केला आहे.

एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले आमचे पेढे...
sanjay raut eknath shinde devendra fadnavis
| Updated on: Apr 27, 2026 | 10:39 AM
Share

राज्यात विधान परिषदेच्या १० जागांसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. येत्या १२ मे रोजी विधानपरिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. तर यासाठी येत्या ३० एप्रिलला अर्ज दाखल केला जाणार आहे. महाविकासआघाडीकडून अद्याप कोण विधानपरिषदेच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे विविध तर्क वितर्क सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नेहमीच्या शैलीत महायुतीवर हल्लाबोल करत महाविकासआघाडीच्या रणनीतीबाबत मोठे विधान केले आहे.

आमच्याच पेढ्यावर तुमचं लक्ष का?

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी विधानपरिषदेच्या जागांसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असणार का, त्यांच्या नावाचे पेढे खायला मिळणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. विधान परिषदेवर जाण्याबद्दल उद्धव ठाकरे नक्की भूमिका स्पष्ट करतील. यासाठी उमेदवारी अर्ज भरावाच लागेल, तेव्हा तुम्हाला आमंत्रित करू. सर्व व्यवस्थित होणार आहे, तुम्हाला पेढे मिळतील, असे संजय राऊत म्हणाले. त्यावर पत्रकारांनी कोणाच्या नावाचे पेढे मिळणार? असा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले, ते नाव तुम्हाला नक्की कळेल. अनेक लोकांचे नाव पेढे वाटायचे आहेत. भाजप, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट सर्वांचे पेढे तुम्ही खा. आमच्याच पेढ्यावर तुमचं लक्ष का? असा मिश्किल सवालही केला.

कोणीही कोणाचा नसतो

या निवडणुकीत होणाऱ्या गुप्त मतदानावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे हे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भाजपची मतंही फोडू शकतात. अमित शाहांनी घडवलेला तो इतका मोठा माणूस आहे. देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात. ते सुपरपॉवर आहेत. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत. कारण हे मतदान गुप्त होणार आहे. कोणीही कोणाचा नसतो. सर्व पैशांचे आहेत, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

फडणवीस-ठाकरे भेटीच्या अफवांवर पूर्णविराम

वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेचा संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात केला. यावर उद्धव ठाकरेंनी कशाला बोलायला हवं? वर्षा बंगला सध्या कोणाच्या मालकीचा आहे? त्यांनी स्वतः खुलासा केला आहे, मग अजून आपल्याला काय हवं?, असे सांगत त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...