AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्यामाप्रसाद मुखर्जींबाबत बोलायला लावू नका… संजय राऊत यांचा इशारा, थेट ब्रिटिशांशी जोडला संबंध

संजय राऊत माध्यमांशी बोलताना खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावरून भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घ्या...

श्यामाप्रसाद मुखर्जींबाबत बोलायला लावू नका... संजय राऊत यांचा इशारा, थेट ब्रिटिशांशी जोडला संबंध
Sanjay RautImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 05, 2026 | 1:08 PM
Share

पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालांनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रेरणास्थान डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावरून भाजपवर टीका केली आहे. “श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी मला सत्य बोलायला लावू नका,” असा इशारा देत राऊत यांनी त्यांच्यावर ब्रिटिशांशी संगनमत केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केल्याचा आरोप

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ज्यांनी कोलकात्यामध्ये मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये सहभागी होऊन स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध केला होता, त्यांच्याविषयी भाजपने न बोललेलेच बरे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल तर मिळू द्या, पण त्यांच्या इतिहासाचे वाभाडे काढायला लावू नका असे ते म्हणाले.

राऊत यांनी पुढे, कलकत्ता विश्वविद्यालयामध्ये युनियन जॅक फडकवून ब्रिटिशांच्या त्या झेंड्याला सॅल्युट मारण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीच जबरदस्ती केली होती. भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने राष्ट्रवादाची व्याख्या बदलली आहे, त्याच पद्धतीने आज मोदी सुद्धा ट्रम्पला सॅल्युट मारत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदींच्या विजयाचा शेअर बाजारावर परिणाम?

देशातील आर्थिक परिस्थिती आणि शेअर बाजारातील घसरणीवरूनही राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्या क्षणी मोदी जिंकल्याची बातमी आली, त्याच क्षणी भारताचा शेअर बाजार कोसळला आणि रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली. रुपया डॉलरच्या तुलनेत ९६ वर येऊन ठेपला आहे. ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे.

‘मोदींनी खरं बोलायला शिकावं’

बंगालच्या निकालांचा संदर्भ देत राऊत यांनी सांगितले की, बंगालमधील विजयाची बातमी येताच रुपया साडे ९५ ते ९६ रुपयांपर्यंत लुडकला. मोदींनी आता तरी खरं बोलायला शिकलं पाहिजे. त्यांनी स्वतः खरं बोलण्याचे धडे घेतले पाहिजेत आणि आपल्या सहकाऱ्यांनाही ते दिले पाहिजेत, असा सल्ला राऊत यांनी दिला.

Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं