ठाकरेंचे 3 खासदार फुटणार? अखेर संजय राऊतांनी सगळं सांगितलं, बैठकीनंतर मोठी माहिती समोर!

ठाकरे यांच्या पक्षातील संसदीय गटाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर यावर भाष्य केलं आहे.

ठाकरेंचे 3 खासदार फुटणार? अखेर संजय राऊतांनी सगळं सांगितलं, बैठकीनंतर मोठी माहिती समोर!
uddhav thackeray and sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 2:50 PM

UBT MP : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे काही खासदार लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात दाखल होणार आहेत, असा दावा केला जातोय. याआधी ठाकरेंच्या काही खासदारांनी शिंदे तसेच शिंदे यांच्या नेत्यांश भेटीदेखील घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता याच कथित खासदारफुटीच्या मुद्द्यावर मोठी माहिती समोर आली आहे.  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार खरंच शिंदे यांच्या पक्षात जाणार का? नेमकं सत्य काय? याबाबत त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

ऑपरेशन टायगरवर केलं भाष्य

ठाकरे यांच्या पक्षातील संसदीय गटाची बैठक आज (14 जून) पार पडली. या बैठकीला  ठाकरे यांच्या पक्षाचे तीन खासदार अनुपस्थित होते, असे सांगितले जात होते. यावरच बैठक संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर यावर भाष्य केलं आहे.

कोण हजर, कोण गैरहजर?

उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली होती. खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. उरलेले पाच खासदार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तेथून ओमराजे उपस्थित होते. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत. ते शिर्डीच्या रुग्णालयातून उपस्थित होते. नागेश आष्टीकर यांचे चिरंजीव हे विधानपरिषदेच्या निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. त्यामुळे त्यात ते गुंतलेले आहेत. आष्टीकरांनही या बैठकीत भाग घेतला. वाशीमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरी मंगल कार्याचे काम सुरू आहे. मुलीच्या लग्नाबाबत बैठक होती. तेही ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

सर्व खासदार ठाकरेंची भेट घेणार

नऊच्या नऊ खासदार हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, ते पुढच्या तीन दिवसांत प्रत्यक्ष मातोश्रीवर येऊन ठाकरे यांची भेट घेतील, अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली.

Follow Us