Sanjay Raut : रावणामध्ये अनेक दुर्गण असतील पण रावणाने कधी..राम मंदिर मुद्यावर भाजपला सर्वात जास्त लागेल असं राऊत बोलले

"महाराष्ट्रात याक्षणी कायद्याचा राज्य आहे असं वातावरण नाही. हे मुली, महिलांवरील अत्याचारासंदर्भात म्हणत नाहीय. कायद्याची धुळधाण सुरु आहे. पेपेर फुटतायत, हे पेपर फोडणारे लोक भाजपशी संबंधित आहेत" असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut : रावणामध्ये अनेक दुर्गण असतील पण रावणाने कधी..राम मंदिर मुद्यावर भाजपला सर्वात जास्त लागेल असं राऊत बोलले
Sanjay Raut
| Updated on: Jun 30, 2026 | 10:56 AM

राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या मुद्यावरुन खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला. “जो पक्ष रामद्रोह करुन राम मंदिरातील दान पेट्यांचा अपहार करतो, त्याचं पक्षाचे लोक विद्यार्थ्यांशी, त्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. रावणामध्ये अनेक दुर्गण असतील पण रावणाने कधी दानपेट्या लुटल्या नाहीत. पण हे रामभक्त जे आहेत यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये 66 वेळा दानपेट्या लुटल्या. गझनवीने सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटला असं इतिहास सांगतो. पण भाजपच्या लोकांनी 66 वेळा अयोध्येत राम मंदिर लुटलं. याची सुद्धा नोंद इतिहासात व्हायला पाहिजे” अशी भाजपवर जिव्हारी लागणारी टीका संजय राऊत यांनी केली.

“कायदा भाजपसाठी नाही विरोधी पक्षांसाठी आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी कितीही बलात्कार केला, देश लुटला, पक्षांतर केली, तरी कायदा त्यांच्यासाठी नाही. भाजपला विरोध करणारे जे लोक आहेत, त्यांच्याभोवती फास आवळण्यासाठी कायदा आहे” अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी केली.

तर त्या लहान मुलीचं बलिदान वाया गेलं असच म्हणावं लागेल

नसरापूर बलात्कार प्रकरणात न्यायालयाने महिन्याभरात निकाल दिला. त्यावर’सरकारचं फार मोठं शौर्य किंवा कतृर्त्व आहे असं मला वाटत नाही’ असं संजय राऊत म्हणाले. “नसरापूर प्रकरणात ज्या बालिकेवर अत्याचार झाला,हत्या झाली त्यानंतर जो जनतेचा रोष उसळला त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टात अतिशय वेगवान ऐतिहासाक पद्धतीने हा खटला चालला. आरोपीला फाशीची शिक्षा झाली. पण राज्यात कायद्याचा धाक असता अशा प्रकारच्या आरोपीच्या मनात न्यायालय, कायदा, सरकार या विषयी दहशत असती तर मुलीचे प्राण वाचले असते” असं संजय राऊत म्हणाले. “अशा प्रकारच्या घटना राज्यात सातत्याने घडतायत हे दुर्देव आहे. अशा घटना घडल्यावर आपण जागे होतो. त्यात सुधारणा सरकार करणार नसेल तर त्या लहान मुलीचं बलिदान वाया गेलं असच म्हणावं लागेल” असं संजय राऊत म्हणाले.

याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलीय

“महाराष्ट्रात याक्षणी कायद्याचा राज्य आहे असं वातावरण नाही. हे मुली, महिलांवरील अत्याचारासंदर्भात म्हणत नाहीय. कायद्याची धुळधाण सुरु आहे. पेपेर फुटतायत, हे पेपर फोडणारे लोक भाजपशी संबंधित आहेत. काल नीट, सीईटी, टीईटी हे सगळे धागेदोरे भाजपच्या कार्यकर्ते, नात्यागोत्या पर्यंत पोहोचतायत. याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे” असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us