Sanjay Raut : पार्थ पवार यांच्या क्लीनचीटवर संजय राऊत एकदम स्पष्ट शब्दात बोलले की….

Sanjay Raut : "भाजपचा महापौर मुंबईत बनणं हा मुंबईसाठी, 106 हुतात्म्यांसाठी, मराठी मनासाठी काळा दिवस असेल. मुंबईचं अस्तित्व, मुंबईची अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपने केली आहे. भविष्यात ही मुंबई उद्योगपतींच्या हातात दिली जाईल. भाजपची भूमिका ही कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे" असा दावा संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut : पार्थ पवार यांच्या क्लीनचीटवर संजय राऊत एकदम स्पष्ट शब्दात बोलले की....
Sanjay Raut
| Updated on: Feb 05, 2026 | 10:45 AM

“विलिनीकरणाचा विषय त्यांच्यावर सोडाना. आपण कशाला त्यात मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? हा त्यांचा विषय असेल तर त्यांनी त्यातून मार्ग काढावा किंवा निर्णय घ्यावा. प्रत्येकवेळी तुम्ही इतर पक्षाच्या नेत्यांना विचारणार. विलिनीकरण हा त्यांचा विषय आहे. पण सध्या सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत हे फार इंटरेस्टिंग आहे” असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. “अजित पवार यांच्या दु:खद निधनानंतर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जोरात सुरु झालं. विशेषत: अजित पवार गटाकडून. ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं. पद आणि प्रतिष्ठा दिली. ताकद दिली. ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करु नये असे सल्ले देतायत. हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे” असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवार साहेब अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आमचा विषय इंडिया ब्लॉकशी, महाविकास आघाडीशी संबंधित आहे. शरद पवारांचा पक्ष मविआ आणि इंडिया ब्लॉगचा सदस्य आहे. जे काही पंतग उडवले जात आहेत, एक गट म्हणतो चर्चा झाली, एक म्हणतो चर्चा झाली नाही. यात विश्वास कोणावर ठेवायचा” असं संजय राऊत बोलले.

तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचाराव असं काही नाही

“सुनेत्रा ताईंनी त्यांचा पती गमावला आहे. शरद पवार यांनी फक्त पुतण्या नाही तर मुलासारख्या अजित पवारांना गमावलं आहे. शरद पवार त्यांच्या सूनबाईच्या घरी गेले असतील, तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचाराव असं काही नाही” असं संजय राऊत म्हणाले.

चेले पवार साहेबांना त्यांच्यासोबत घ्यायला इच्छुक दिसत नाहीत

“हे मी काल सुद्धा सांगितलय फडणवीसांवर अजित पवारांचा विश्वास नसेल. विलिनीकरणाबाबत काही चर्चा सुरु होती, याची माहिती होती आमच्याकडे. त्यांच्या चर्चेला खीळ बसली. जेव्हा ते निर्णय घेतील, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतील तेव्हा प्रश्न आम्हाला विचारा. अजित पवार गटाचे लोक आपली भूमिका मांडतात तेव्हा मला अस दिसतय की शरद पवार यांचे एकेकाळचे चेले पवार साहेबांना त्यांच्यासोबत घ्यायला इच्छुक दिसत नाहीत. मोदी-शाह यांची इच्छा नसावी” असं संजय राऊत म्हणाले.

पार्थ पवार यांच्या क्लीनचीटवर काय म्हणाले?

पार्थ पवार यांना क्लीनचीट देण्याच्या विषयात म्हणाले की, “हायकोर्टाने यावर काही ताशेर मारले होते ते सहज पुसले जाणार नाहीत. फडणवीस हे कायद्याचे रक्षक नाहीत, महाराष्ट्रात कायदा सगळ्यांसाठी समान नाही. पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीनचीट घेऊन बाहेर पडायला पाहिजे होतं. कारण ते राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहेत. पार्थ पवार यांचा या व्यवहाराराशी काही संबंध नाही, याला बेनामी काम करणं असं म्हणतात. कायदेशीर भाषेत बेनामी व्यवहार म्हणतात. सरकार त्यांचं, मुख्यमंत्री त्यांचा आहे. त्यांचा पक्ष फडणवीस चालवत आहेत. अशावेळी महाराष्ट्राची जनता काय करु शकते” असं संजय राऊत म्हणाले.