बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथ मारा, आधी चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा, संजय राऊत कडाडले

| Updated on: Apr 12, 2023 | 11:38 AM

एकनाथ शिंदे यांना उद्धेशून संजय राऊत म्हणाले,'राजकीय उत्सव हे साजरे करणारे, बाळासाहेबांचा अपमान सहन करणाऱ्यांना आजही मांडीला मांडी लावून बसवतात

बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथ मारा, आधी चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा, संजय राऊत कडाडले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा अपमान करणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्या, चंद्रकांत पाटील यांचा आधी राजीनामा घ्या, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. स्वतःला शिवसेनेचा वारसदार, शिलेदार समजणारे एकनाथ शिंदे अजूनही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हा शुद्धा लाचार, लाळघोटेपणा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. मात्र तरीही ठाकरे गटाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय.

संजय राऊत काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांना उद्धेशून संजय राऊत म्हणाले,’राजकीय उत्सव हे साजरे करणारे, बाळासाहेबांचा अपमान सहन करणाऱ्यांना आजही मांडीला मांडी लावून बसवतात. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी याचा साधा निषेधही नाही केला. यांना कोण वारसदार म्हणणार? आजही ते तुमच्याबरोबर बसत असतील तर तुम्ही खरोखर लाचार, लोचट आणि मिंधे आहात.बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असू नये. मुख्यमंत्री आणि ४० आमदार खुलासे करणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय.

ढुंगणावर लाथ मारून हाकलून द्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येतंय. त्यांच्या सांगण्यावरूनच चंद्रकांत पाटील यांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. असं असलं तरीही केवळ या प्रकाराने आमचं समाधान होणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली. ते म्हणाले, ‘नाराजी व्यक्त करून काय फायदा? बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथ मारा… हा लोचटपणा, लाळघोटेपणा, मिंधेपणा, फडतूस पणा आहे. हा अपमान तुम्ही सहन करताय, हा काय प्रकार आहे? वारसदार, शिलेदार म्हणवता…. नाव घेऊ नका बाळासाहेबांचं.. अशा शब्दात राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना खडसावलंय.

अमित शहांकडून नाराजी?

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांनीदेखील नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येतंय. संजय राऊत यांनी मात्र या शक्यता फेटाळून लावल्यात. ते म्हणाले, अमित शहांनी असे काही केल्याचं मला माहिती नाही. असेल तर कुठे बोललेत? त्यांनी जाहीरपणे का बोलले नाहीत … आमची मूळ मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. कारण ते स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार समजतात…