Draught Announcement : सरकार पेटारा उघडणार, शेतकऱ्यांच्या मतदीसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता; मंत्र्यानेच दिली आतली खबर!

आता सरसकट पंचनामे करणे गरजेचे आहे. पिण्याचे पाणी कसे उलबद्ध करता येईल इथपासून सुरुवात करावी लागणार आहे. पाण्याचा साठा कुठून आणणार हा प्रश्न आहे, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले.

Draught Announcement : सरकार पेटारा उघडणार, शेतकऱ्यांच्या मतदीसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता; मंत्र्यानेच दिली आतली खबर!
farmers drought and devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 6:22 PM

Sanjay Shirsat : सध्या राज्यात पावसाने दडी मारलीय. मराठवाडा, विदर्भात तर दुष्काळसदृश स्थिती आहे. शेतकऱ्यांनी लावलेले उभे पीक करपून गेलेय. काही ठिकाणी तर शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर नांगर फिरवतायत. राज्यातील कृषीमंत्री दत्ता भरणे राज्यभर दौरा करून पिकांची स्थिती समजून घेत आहेत. लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा आणि आम्हाला भरीव मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. विरोधकही याच मागणीवरून आक्रमक झाले आहेत. दरम्यान, सध्या मंत्री असलेले संजय शिरसाट यांनी याच दुष्काळावर महत्त्वाची माहिती दिली आहे. लवकरच राज्य सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं, असं संजय शिरसाट म्हणालेत.

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत

संजय शिरसाट यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुंबई कार्यालयातील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांची स्थिती यावर भाष्य केलं. दुष्काळ जाहीर करावाच लागेल, असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. ‘आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहोत. वस्तूस्थिती माहिती नसताना काहीही बोलणं चुकीचं आहे. आपण शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. शेतकरी आज अडचणीत आहेत. आज अशीच परिस्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत देणे गरजेचे आहे,’ असं शिरसाट स्पष्टपणे म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

तसेच, शेतकरी टिकला पाहिजे. शेतकरी उद्ध्वस्त होत चालला आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारला दुष्काळ जाहीर करावाच लागेल. परतीचा पाऊस गायब झाला आहे. परतीचा पाऊस कुठेच नाही. आमच्याकडे जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी पुन्हा घसरत आहे. येणारा उन्हाळा आमच्यासाठी कोरडाठाक असणार आहे,” अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

आता सरसकट पंचनामे करणे गरजेचे आहे. पिण्याचे पाणी कसे उलबद्ध करता येईल इथपासून सुरुवात करावी लागणार आहे. पाण्याचा साठा कुठून आणणार हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री याबाबत चांगली भूमिका घेत आहेत. लोकांना दिलासा मिळावा ही सरकारची भूमिका असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us