AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Shirsat : मराठीचा पुळका फक्त एका पक्षालाच आहे आणि बाकी..मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत

Sanjay Shirsat : "एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहे, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. या संदर्भातील निर्णय योग्य वेळी एकनाथ शिंदे साहेब घेतील" असं संजय शिरसाट म्हणाले.

Sanjay Shirsat : मराठीचा पुळका फक्त एका पक्षालाच आहे आणि बाकी..मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत
Raj Thackeray-Sanjay Shirsat
| Updated on: Apr 30, 2026 | 11:37 AM
Share

“UBT संपवण्यासाठी त्यांच्या पक्षातील लोकच तयार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सेफसाईड म्हणून निवडणुकीतून बाहेर पडले. अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये” अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली. “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकल्या. आमचा स्ट्राइक रेट वाढला. शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळे परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाही. आमच्याकडे रोज एवढे प्रवेश होत आहेत की आम्हाला वेळ देता येत नाही. जे कार्यकर्ते येतात ते स्वतःच्या मर्जीने येतात. त्याचा परिणाम विधान परिषदेत दिसेल. एकनाथ शिंदे यांचा निर्णय घेण्याचा टायमिंग असतो. त्या टायमिंग नुसार ते निर्णय घेतील. बच्चू कडूंच्या बाबतीत 12 वाजेपर्यंत निर्णय होईल” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी ही एकत्र नाहीच आणि त्यांच्यात एक वाक्यता कधीच नव्हती. कोणाला उमेदवारी दिली आणि कोण नाराज यापेक्षा तो पक्ष कुठे आहे ते शोधावं लागेल. काँग्रेसने यापूर्वी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी राज्यसभेच्या वेळेला सुद्धा त्यांनी कॉम्प्रमाईज केलं. उद्धव ठाकरे विधान परिषदेला असतील तर आम्ही कॉम्प्रमाईज करू असं स्पष्ट सांगितलं होतं. मात्र उमेदवार जाहीर होईपर्यंत काँग्रेसला सूचना देखील दिली गेली नाही .काँग्रेसचा अपमान करण्याचे काम उबाठाने केले. काही गेलं तरी चालेल. मात्र, आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही. या भूमिकेत कदाचित ते असतील. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढेल असे आत्तातरी वातावरण आहे” असं अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवर संजय शिरसाट म्हणाले.

घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत

“उद्धव ठाकरेंना पराभवाची भीती आहे. त्यांना सर्व प्रकारची जाणीव आणि माहिती असते. UBT संपवण्यासाठी त्यांच्या पक्षातील लोकच तयार आहेत. घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सेफसाईड म्हणून निवडणुकीतून बाहेर पडले” असं संजय शिरसाट म्हणाले.

उमेदवारी दिली तरच त्यांनी कुर्बानी करावी

“अंधारे यांना उमेदवारी दिली तरच त्यांनी कुर्बानी करावी. अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये. आम्ही 42 वर्षापासून काम करतो. एक-दोन दिवसाचा हा प्रवास नाही आणि त्यासाठी एकनाथ शिंदे असावे लागतात. ज्योती वाघमारे यांना स्वप्नात नसताना एका मिनिटात उमेदवारी देऊन राज्यसभेवर पाठवलं” असं सुषमा अंधारे यांच्या स्टेटसवर संजय शिरसाट म्हणाले.

मराठीसाठी लढा द्यायला आम्ही देखील तयार

“मराठी शाळा बंद करणे हा कोणत्याही राजकीय नेत्याचा विषय असू शकत नाही. मराठी टिकली पाहिजे, केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ती तशीच राहिली पाहिजे. मराठीच्या स्वाभिमानाला कोणीही ठेस पोहोचवू नये. मराठीचा पुळका फक्त एका पक्षालाच आहे आणि बाकी आम्ही हिंदी भाषिक आहोत, असे समजण्याचे काही कारण नाही. मराठीसाठी लढा द्यायला आम्ही देखील तयार आहोत” असं संजय शिरसाट म्हणाले.

Follow Us
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?