AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा खुलासा, अखेर तो धागा सापडलाच, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड, विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात संभाषण

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने मोठा खुलासा केला. त्यानुसार या सर्व प्रकरणात वाल्मिक कराड याचा स्पष्ट हात असल्याचे म्हटले आहे. संघटित गुन्हेगारीचे प्रकरण असल्यानेच कराडवर मोक्का लावल्याचे एसआयटीने न्यायालयात स्पष्ट केले आहे. या खुलाशामुळे कराडचा पाय खोलात आहे.

मोठा खुलासा, अखेर तो धागा सापडलाच, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड, विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात संभाषण
मोठा खुलासा, वाल्मिक कराड याने दिली संतोष देशमुख यांना धमकी
| Updated on: Jan 15, 2025 | 3:45 PM
Share

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती.  या हत्येच्या दिवशीच सध्या मोक्का लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांनीच ही माहिती आज केज कोर्टात दिली. सध्या याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. या तिघांमध्ये दहा मिनिटे संभाषण झाले. संतोष देशमुख यांचे अपहरण आणि या तिघांमधील संभाषण याची वेळ जुळत असल्याचे दिसून येत आहे. आता हा मोठा धागा पोलीस यंत्रणेच्या हाती आला आहे.

दहा मिनिटे संभाषण

संतोष देशमुख यांचे अगोदर अपहरण करण्यात आले. त्यानंतर कारमध्ये त्यांना मारहाण करण्यात आली. संतोष देशमुखांची हत्या झाली तेंव्हा ३ वाजून २० मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटे या काळात म्हणजे १० मिनिटे वाल्मिक कराड, विष्णु चाटे आणि सुदर्शन घुले मध्ये संभाषण झाले. त्यामुळे पोलिसांचा तपास आता रुळावर आल्याचे बोलले जात आहे. आता या संभाषणात काय होते, या तिघांमध्ये काय बोलणे झाले याची चौकशी करण्यात येत आहे. या तीनही आरोपींमध्ये दहा मिनिटांमध्ये काय चर्चा झाली हे तपासात समोर येईल. त्यामुळे वाल्मिक कराडचा या संपूर्ण खून प्रकरणात संबंध आहे का, त्याचा थेट सहभाग आहे का, हे तपासानंतर समोर येणार आहे.

वाल्मिक कराडची संतोष देशमुख यांना धमकी

वाल्मिक कराड याने हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचे एसआयटीने न्यायालयात सांगितले. एसआयटीने वाल्मिक कराड याच्यावर मोक्का का लावण्यात आला यासंबंधीची बाजू मांडली. हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना धमकावल्याचा दावा एसआयटीने केला. त्यासाठी ९ मुद्दे एसआयटीने मांडले आहेत.

वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची विनंती

केज न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एफआयआरमध्ये संतोष देशमुख यांच्या अपहरणातील वेळ आणि आता या तीन आरोपींमधील संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे वाल्मिकचा पाय आता अधिक खोलात गेला आहे. वाल्मिक कराड याच्या दहा दिवसांच्या कोठडीची विनंती एसआयटीने केली आहे.

Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट